महाराष्ट्रातील एकीकडे अवकाळी तर दुसरीकडे उष्णतेची लाट

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 24 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

नागपूरात मध्यरात्री अनेक भागात पाऊस झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी पाऊस पडला आहे. दिवसभर ढगाळ वातावरणानंतर मध्यरात्री विजांचा कडकडाटसह पावसाने हजेरी लावली आहे. आजही सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे. अनेक ठिकाणी तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. 

देशभरात लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय तापमान गरम होत आहे. तसा आता तापमानाचा पाराही हळूहळू वर चढत आहे. हवामान विभागाने काही राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्याचबरोबर जवळपास ८ राज्यांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते  असा, इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. राज्यात आज अनेक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे. अनेक ठिकाणी तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कमाल तापमान चाळीस अंशांवर पोहचले आहे. त्यामुळे राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

सोलापूर येथे राज्यात सर्वाधिक ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानाची ही स्थिती अजून एक ते दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहेय. त्यानंतर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आज विजांच्या गडगडासह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये देखील गारपीट अन् अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. छत्तीसगडमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील आठवड्यामध्ये १० एप्रिल आणि १३ एप्रिल रोजी पश्चिमी हवामान बदल अपेक्षित असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशामध्ये १० ते १३ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. १३ एप्रिल रोजी पंजाब आणि चंडीगडमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे. ९ ते ११ एप्रिलदरम्यान छत्तीसगडमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.बिहारमध्येही तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.