व्हिजन आणि मुद्देच नसल्यामुळे विरोधकांकडून अपप्रचार - इत्मियाज जलील

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 12 d ago
खासदार इम्तियाज जलील
खासदार इम्तियाज जलील

 

जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हा विराेधक अपप्रचार सुरु करतात. विनाकारण नाहक गाेष्टींचा इशू केला जाताे. विराेधकांकडे व्हिजन आणि मुद्दे नसल्यानेच ते खालच्या पातळीवर जाऊन आरोप करत आहेत. त्यांचा तसा प्लान आहे असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले. 

छत्रपती संभाजीनगर शहराच्या नारेगाव भागामध्ये आज (साेमवार) असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत खासदार एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली. यावेळी नागरिकांकडून घराच्या छतावरून पुष्पवृष्टी करत असदुद्दीन ओवैसी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी असदुद्दीन ओवैसींनी इम्तियाज जलील यांना पुन्हा खासदार करा असे आवाहन नागरिकांना केले. 

खासदार इम्तियाज जलील साम टीव्हीशी बाेलताना म्हणाले नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे. विराेधकांच्या जाहीरनाम्यात काहीच नाही. त्यामुळे ते खालच्या पातळीवर जाऊन आरोप करत आहेत. मी लोकांना आधीच सांगितलं होतं इलेक्शन जवळ आल्यावर या सगळ्या प्रश्नांना सामोरे जावं लागेल असेही जलील यांनी नमूद केले.