ऑस्ट्रेलियात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

ऑस्ट्रेलियात शिक्षण घेणाऱ्या देश-विदेशातील विद्यार्थ्यांना मोठ्या आर्थिक अडथळ्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टुडंट व्हिसासाठी आवश्यक असलेल्या बँक बॅलन्समध्ये वाढ करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन स्टुडंट व्हिसा मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या बचतीच्या रकमेमध्ये यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्ये वाढ करण्यात आली होती.

ऑस्ट्रेलियाने परदेशी विद्यार्थ्यांना व्हिसा मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान बचतीत वाढ केली आहे. १० मे २०२४ पासून, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांचा व्हिसा मिळविण्यासाठी किमान ऑस्ट्रेलियन डॉलर २९,७१० च्या बचतीचा पुरावा दाखवावा लागेल. ऑक्टोबरमध्ये, किमान बचत रक्कम ऑस्ट्रेलियन डॉलर २१,०४१ वरून ऑस्ट्रेलियन डॉलर २४,५०५ पर्यंत वाढवली आहे. सात महिन्यांतील ही दुसरी वाढ आहे.

ऑस्ट्रेलियन सरकारने परदेशी नागरिक आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीचे इमिग्रेशन कायदे बदलले आहेत. ऑस्ट्रेलियन विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणारे संभाव्य विद्यार्थी आणि तेथे शिकणारे सध्याचे विद्यार्थी या दोघांवरही या निर्णयाचा परिणाम होणार आहे. 

भारतीय विद्यार्थ्यांना देणाऱ्या व्हिसामध्ये ४८ टक्के घसरण 
एक अहवालानुसार डिसेंबर २०२२ आणि डिसेंबर २०२३ च्या दरम्यान भारतीय विद्यार्थ्यांना देणाऱ्या व्हिसामध्ये ४८ टक्के घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी नोंदणीसाठी भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जानेवारी-सप्टेंबर २०२३ या कालावधीत १.२२ लाख भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकत होते. तर सरकार फसव्या शिक्षण पुरवठादारांवर सरकार कारवाई करत आहे.

२०२२ मध्ये कोविड-१९ निर्बंध शिथिल झाल्यानंतर बरेच लोक ऑस्ट्रेलियाला गेले. यामुळे घरांच्या समस्या देखील निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे सरकारने विद्यार्थी व्हिसा धोरण कठीण केले आहे.

गृहमंत्री क्लेअर ओ नील म्हणाले, "३४ शिक्षण संस्थांना इशारा दिला आहे. दोषी आढळल्यास त्यांना तुरुंगवास आणि विद्यार्थ्यांचा प्रवेश करण्यावर बंदी यांसह गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते."

"आमच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात प्रदात्यांना कोणतेही स्थान नाही. या कृतींमुळे लोकांचे शोषण करणाऱ्या आणि या क्षेत्राची प्रतिष्ठा खराब करू पाहणाऱ्या क्षेत्रातील तळाशी फीडर्सना बाहेर काढण्यात मदत होईल," ओ नील यांनी एका निवेदनात म्हटले आहे.