पंतप्रधानांकडून गुढी पाडव्याच्या खास मराठीत शुभेच्छा

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 24 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आज गुढीपाडवा. राज्यभरात गुढीपाडव्याचा सण आणि मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत केले जात आहे. सर्व स्तरांमधून पाडव्याच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनीही पाडव्याच्या सोशल मीडियावरुन पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा...
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा. गुढी पाडव्याची शुभ पहाट उजाडत असताना, सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. हा सण प्रत्येकाच्या जीवनात अमर्याद आनंद, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो. सर्वांची भावी वाटचाल यशाच्या तेजाने उजळून निघो हीच सदिच्छा, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवारांकडूनही पाडव्याच्या शुभेच्छा...
"नवआकांक्षा आणि नवसंकल्पांनी आजचा गुढीपाडव्याचा सण उत्साहाने साजरा करूया. सुख, समृद्धी व नवचैतन्याची गुढी उभारूया. आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा," अशा शब्दात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनीही पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.