आता आसाममध्येही शिवरायांचा पुतळा

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 23 d ago
आसाम मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
आसाम मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

 

साताऱ्यातील एका सुपुत्राने जम्मू काश्मिरात भारतीय सैन्य दलाच्या केंद्रात सर्वप्रथम उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यानंतर आता दुसऱ्या एका अशाच सुपुत्राने आसाममध्ये सैन्य दलाच्या केंद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. त्याचे नुकतेच अनावरण झाले. 

कोरेगाव तालुक्यातील भोसे येथील लेफ्टनंट कर्नल अमित विजय माने यांनी पुढाकार घेत आपल्या सहकाऱ्यांसह जम्मू काश्मिरात कुपवावाड्यामध्ये ४१ राष्ट्रीय रायफल्स (मराठा लाईट इन्फंट्री)बटालियनमध्ये सात नोव्हेंबर २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. त्याचे अनावरणराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेआणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरमुनगंटीवार आदींनी तेथे समारंभपूर्वक केले. त्याप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलसार्थ अभिमान बाळगणाऱ्या साताऱ्यातील नागठाणे येथील रविराज नलवडे यांनी पुढाकार घेत आसाममध्ये सैन्य दलाच्याकेंद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचाअश्वारूढ पुतळा उभारला आहे.

चीनच्या सीमेलगत आसाममधील जोरहाट येथे भारतीय सैन्य दलाच्या २१ पॅरा स्पेशल फोर्स मराठा २१युनिटचे कमान अधिकारी कर्नलपदीरविराज नलवडे हे कार्यरत आहेत.त्यांनी व ईशान्य सीमेवर संरक्षणार्थतैनात असलेल्या मराठासह इतरयुनिटमधील अधिकारी, जवानांनी एकत्रयेत शिवाजी महाराजांचा अश्वारूढपुतळा उभारण्याचा संकल्प केला होता.त्यानुसार सर्वांनी स्वनिधीमधून पुतळाआणून, संरक्षक दलाची परवानगी वगैरेबाबी पूर्ण करून युनिटमध्ये शिवाजीमहाराजांचा पुतळा उभारला. पुतळ्याचे अनावरण नुकतेच लेफ्टनंट कर्नलह रजितसिंग साही यांच्या हस्ते झाले.
 
यावेळी लेफ्टनंट जनरल हरजितसिंह साही यांनी यांवर  प्रतिक्रिया दिली. आसाममध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे भारतीय सैन्य दलात कार्यरत अधिकारी, जवानांना जशी प्रेरणा मिळते, तद्वतच पुतळ्यामुळे शत्रूवरही कायम दहशत राहील, असे ते म्हणाले.