दिल्ली आंतराराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 24 d ago
 इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय विमानतळ
इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय विमानतळ

 

राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. अशी धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना ५ एप्रिल रोजी दोघांना आंतराराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकासा एअरच्या उड्डाणासाठी सुरक्षा कर्मचारी हे जिग्नेश मालानी आणि कश्यप कुमार लालानी या प्रवाशांचा शोध घेत होते. दोन प्रवासी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. पहिल्यांदा तपासणी केली. त्यानंतर पुन्हा तपास का करताय, असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लोकांच्या सुरक्षेसाठी करत असल्याचे सांगितले. त्यानंतर नाराज झालेल्या प्रवाशांनी म्हटलं की, 'तुम्ही काय कराल, आम्ही अणूबॉम्ब घेऊन जात आहोत'.

दोन प्रवाशांच्या धमकीनंतर विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उतरवण्यात आलं. ' दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितली आहे.
कोण आहे अटक केलेले प्रवासी?
पोलीस उपायुक्त (IGI एअरपोर्ट) उषा रंगानी यांनी म्हटलं की, प्रवासी लालानी आणि मालानी हे दोघेही गुजरातच्या राजकोटमधील निर्माण उद्योगाचे ठेकेदार आहेत. ते एसएस रेलिंगचं साहित्य खरेदी करण्यासाठी दिल्लीत एका व्यापाऱ्याच्या भेटीसाठी गेले होते. या दोघांना जामीन मिळाला आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.