जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज अकिब नबीची धडाकेबाज कामगिरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
वेगवान गोलंदाज अकिब नबी
वेगवान गोलंदाज अकिब नबी

 

जम्मू-काश्मीरमधील वेगवान गोलंदाज अकिब नबीने हॅ‌ट्रिकसह मिळवलेल्या पाच विकेटमुळे उत्तर विभागाने दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत पूर्व विभागाला २३० धावांत गुंडाळले आणि दुसऱ्या दिवसअखेर १७५ धावांची मोठी आघाडी घेतली.

मोहम्मद शमीवर लक्ष केंद्रित असलेल्या या सामन्यात शमीने काल पहिल्या दिवशी चांगला प्रभाव पाडलेला असला तरी आज मात्र तो महागडा ठरला. त्याने ४.३४ च्या सरासरीने २३ षटकांत १०० धावा दिल्या आणि एकच फलंदाज त्याला बाद करता आला. मात्र उत्तर विभागाचे वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी सुरुवातीला नव्या चेंडूवर चमक दाखवली. 

त्यानंतर दिवस गाजवला तो अकिव नबी याने हॅ‌ट्रिकसह पाच विकेट मिळवताना पूर्व विभागाची पाच बाद २०० वरून सर्वबाद २३० अशी घसरगुंडी केली. त्याने पूर्व विभागाकडून सर्वाधिक ६९ धावा करणारा विराट सिंग, मानिशी आणि मुख्तार हुसेन यांना सलग तीन चेंडूंवर बाद केले.

संक्षिप्त धावफलक: उत्तर विभाग, पहिला डाव : ४०५
(यश धुल ३९, आयुष बदोनी ६३, निशांत सिंधू ४७, कन्हैया वाधवन ७६, अकिब नबी ४४ -३३ चेंडू, ५ चौकार, २ षटकार, मोहम्मद शमी २३-४-१००-१, सूरज जयस्वाल १५-३-४४-२, मनिशी २२.२-२-१११-६). 

पूर्व विभाग, पहिला डाव :
५६.१ षटकांत सर्वबाद २३० (उत्कर्ष सिंग ३८, रियान पराग ३९, विराट सिंग ६९, अर्शदीप सिंग १७-३-५१-१, हर्षित राणा १४-३-५६-२, अकिब नबी १०-१-२८-५, निशांत सिंधू ५-१-१९-१).