पक्षाच्या सर्वसाधारण सभेत नवाज शरीफ यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, 'अमेरिकेकडून तीव्र दबाव असताना देखील पाकिस्तानने न्यूक्लिअर टेस्ट घडवून आणल्या. अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी न्यूक्लिअर टेस्ट न करण्यासाठी ५ अब्ज डॉलरची ऑफर केली होती पण, मी ती नाकारली.'
माझ्या पदावर इम्रान खान बसले असते तर त्यांनी क्लिंटन यांची ऑफर स्वीकारली असती, असा दावा शरीफ यांनी केला. तसेच, पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश साकिब निसार यांनी २०१७ मध्ये एका चुकीच्या प्रकरणात मला पंतप्रधान पदावरुन हटवलं, असा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, कोर्टाने शरीफ यांना ६ वर्षे निवडणूक लढवण्यासाठी बंदी घातली होती. त्यानंतर ते लंडनमध्ये पसार झाले होते. फेब्रुवारीमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पाकिस्तानमध्ये परत आले होते. त्यांच्या पक्षाला देशात चांगले यश मिळाले असून आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले आहे.