सानिया मिर्झा बनणार देशाची पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 4 Months ago
सानिया मिर्झा
सानिया मिर्झा

 

Success Story : सानिया मिर्झाचं सध्या सगळीकडे कौतुक सुरू आहे. त्याला कारणही तसंच आहे. सानिया मिर्झाने एनडीए परीक्षेत १४९ वा क्रमांक पटकावला आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या १९ जागांपैकी फ्लाइंग विंगमध्ये तिला दुसरे स्थान मिळाले आहे. सानिया मिर्झा आता लवकरच फायटर पायलट बनणार आहे. सानिया मिर्झा नॅशनल डिफेंस अॅकेडमी (एनडीए) मधून उत्तीर्ण होऊन देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट बनणार आहे.

 

सानिया मिर्झा ही मिर्झापूरच्या देहात कोतवाली क्षेत्रातील जसोवरमध्ये राहाणाऱ्या एका टीव्ही मेकॅनिकची मुलगी आहे. तिच्या वडिलांचे नाव शाहिद अली असे आहे. सानियाने तिचे १० वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पंडित चिंतामणि दुबे इंटर कॉलेजमधून पूर्ण केले आहे. ती इयत्ता १२ वी मध्ये देखील जिल्ह्यात टॉप केलं. सानियाने १० एप्रिल २०२२ रोजी एनडीएची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर नोव्हेंबरमध्ये जाहीर झालेल्या यादीतही तिचे नाव आहे. ती २७ डिसेंबर रोजी खडकवासला, पुणे येथील एनडीए अॅकॅडमीमध्ये सामील होणार आहे.

 

सानियाने लहानपणापासूनच हवाई दलात भरती होण्याचे आणि फायटर पायलट बनण्याचे स्वप्न पाहिले होते. बारावीच्या शिक्षणानंतर तिने यासाठी कोचिंगही केले. तिची मेहनत अखेर फळाला आली आहे. तिच्या या कामगिरीचा तिच्या आई-वडिलांशिवाय संपूर्ण जिल्ह्याला अभिमान आहे.