राज्यात ‘नॅस’नंतर होणार ‘स्लॅस’ सर्वेक्षण

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
मराठी शाळा
मराठी शाळा

 

औरंगाबाद : कोरोना काळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले होते. राज्यातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वेक्षण (नॅस) करण्यात आले होते. त्यानंतर आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (स्लॅस) शिक्षण विभागातर्फे करण्यात येणार आहे.

राज्यात तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे ‘स्लॅस’चे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत मार्चच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. हे सर्वेक्षण हे मराठी माध्यमाच्या प्रथम भाषा मराठी व गणित या विषयांचे करण्यात येणार आहे. राज्यभरातील इयत्ता तिसरीच्या ३ हजार ७५६, पाचवीच्या ४ हजार ५०; तर आठवीच्या ४ हजार १२७ शाळांमध्ये स्लॅस सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन समन्वयकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्यातील एकूण ११ हजार ९३३ शाळांमध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणाच्या अनुषंगाने निवडण्यात आलेल्या शाळेचा पट, माध्यम यांची पडताळणी करून तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, मनपा स्तरावर शिक्षणाधिकारी आणि संबंधित तालुका समन्वयक यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार आहे.

स्लॅस सर्वेक्षणाचा उद्देश
‘स्लॅस’ सर्वेक्षणात तिसरी, पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी भाषा विषय आणि गणित यासंबंधी विद्यार्थ्यांचे ज्ञान तपासले जाणार आहे. त्यात विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी समजून घेणे, विद्यार्थ्यांच्या अडचणीवर समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. स्लॅसमध्ये जिल्हा परिषद, शासकीय, मनपा, सरकारी अनुदान प्राप्त शाळा सहभागी होणार आहेत.

जिल्हानिहाय शाळा
औरंगाबाद : ५७२
अकोला : १९२
अमरावती : ३३७
औरंगाबाद : ४९६
भंडारा : १६३
बीड : ४३७
बुलडाणा : ३५९
चंद्रपूर : ३०४
धुळे : २२१
गडचिरोली : १५९
गोंदिया : १८६
हिंगोली : २१९
जालना : ३५६
जळगाव : ४९३
कोल्हापूर : ४९७
लातूर : ३७८
मुंबई : ९९
मुंबई उपनगर : ९५
नागपूर : ३४४
नांदेड : ५१३
नंदुरबार : २०९
नाशिक : ६७८
उस्मानाबाद : २६६
पालघर : ३३९
परभणी : ३२३
पुणे : ७१२
रायगड : २२९
रत्नागिरी : १४०
सांगली : ३८७
सातारा : ३८३
सिंधुदुर्ग : ९५
सोलापूर : ५७३
ठाणे : ३६३
वर्धा : १५६
वाशीम : १८३
यवतमाळ : ४७७