'ऑपरेशन सिंदूर 'दरम्यान भारताच्या कारवाईमुळे हादरलेल्या पाकिस्तानने संघर्षविरामासाठी विनंती केल्यानंतर उभयमान्य सहमतीनुसार आज दोन्ही देशांच्या लष्करी कारवाई विभागाच्या महासंचालकांची (डीजीएमओ) चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार थांबविणे, एकमेकांविरुद्ध कोणतीही आक्रमक किंवा शत्रुत्वाची कृती न करण्याची बांधिलकी व्यक्त करणे या मुद्द्यांवर चर्चा झाली. जाहीर वेळापत्रकाप्रमाणे दुपारी बाराला होणार असलेली ही चर्चा सायंकाळी पाच वाजता झाली.
भारत आणि पाकिस्तान संघर्ष विरामासाठी तयारी असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (ता. १०) पान ७ वरगोळीबार थांबविण्याबाबत चर्चा जगजाहीर केल्यानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी औपचारिकपणे संघर्षविरामाची घोषणा केली होती. पाकिस्तानी 'डीजीएमओ'ने भारतीय 'डीजीएमओं'ना विनंती केली होती, असे मिस्त्री यांनी स्पष्ट केले. या सहमतीनंतर लष्करी कारवाई थांबली होती. तसेच सोमवारी पुन्हा चर्चा होणार निवेदनाद्वारे स्पष्ट केले होते. त्यानुसार, आज 'डीजीएमओ' लेफ्टनंट जनरल राजीव घई आणि आणि पाकिस्तानचे 'डीजीएमओ' यांची आज चर्चा झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्यासह सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग, आणि नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्यासमवेत बैठक घेऊन 'ऑपरेशन सिंदूर 'नंतरच्या संघर्ष विरामाचा व सीमेवरील स्थितीचा आढावा घेतला.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter