दहावीचा निकालाची 'ही' आहेत ठळक वैशिष्ट्ये

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 7 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर केला. फेब्रुवारी- मार्चमध्ये घेतलेल्या या परीक्षेसाठी  १६, ११, ६१० विद्यार्थी बसले होते. यंदाचा एकूण निकाल ९४.१० टक्के लागला असून, कोकण विभागाने ९८.८२ टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे मुलींचा निकाल ९६.१४ टक्के तर मुलांचा ९३.३१ टक्के आहे. राज्य मंडळाने निकाल अधिकृत संकेतस्थळांवर (https://sscresult.mahahsscboard.in, https://results.digilocker.gov.in, http://sscresult.mkcl.org) जाहीर केला.  

विभागनिहाय निकाल 
नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतलेल्या या परीक्षेत कोकण विभागाने ९८.८२ टक्क्यांसह पहिला क्रमांक मिळवला. यंदा कोल्हापूर विभागाने ९७.४५ टक्क्यांसह दुसरे स्थान पटकावले, तर मुंबई ९५.८४ टक्के आणि पुणे ९४.८१ टक्क्यांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिले. तर नाशिकचा ९३.०४ अमरावती ९२.९५, छत्रपती संभाजीनगर ९२.८२, लातूर 92.७७ आणि नागपूर विभाग ९०.७८ टक्के असा निकाल लागला आहे.    


निकालाची ठळक वैशिष्ट्ये
१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४६,५७९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,५५,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१० आहे.
 
२. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २८,५१२ खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८,०२० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी २२,५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.३६ आहे.
 
३. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २४,३७६ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २३,९५४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी ९,४४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३९.४४ आहे.
 
४. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, खाजगी व पुनर्परिक्षार्थी मिळून एकूण १६,१०,९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,९८,५५३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,८७,३९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतची टक्केवारी ९३.०४ आहे.
 
५. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ९,६७३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,५८५ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी ८,८४४ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी १२.२७ आहे.
 
६. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९८.८२%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९०.७८%) आहे.
 
७. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतची टक्केवारी ९६.१४ असून मुलांच्या उत्तीर्णतची टक्केवारी
 
९२.३१ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ ने जास्त आहे.
 
८. माध्यमिक शालान्त (इ.१० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ करीता एकूण ६२ विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी एकूण २४ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे.
 
९. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४,८८,७४५ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ४,९७,२७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३,६०,६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, १,०८,७८१ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
 
१०. राज्यातील २३,४८९ माध्यमिक शाळांतून १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,९२४ शाळांचा निकाल १००% लागला आहे.

मार्च २०२४ चा निकाल ९५.८१ टक्के आहे व फेब्रु. मार्च २०२५ चा निकाल ९४.१० टक्के आहे. मार्च २०२४ च्या तुलनेत फेब्रु. मार्च २०२५ निकाल १.७१ टक्के ने कमी आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter