कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या केवळ अस्तित्वाने चैतन्य फुलवणाऱ्या आणि आपल्या प्रत्येक कृतीतून केवळ मैदानावरीलच नव्हे तर सातासमुद्रापार प्रेक्षकांनाही खिळवून ठेवणाऱ्या कसोटी क्रिकेटमधील विराट युगाची सांगता झाली. किंग कोहली असा चाहत्यांकडून सन्मान मिळालेल्या महान विराट कोहलीने आज सोमवारी (१२ मे) निवृत्ती जाहीर केली.
भारतीय क्रिकेटचा हिटमॅन म्हणून ओखळल्या जाणाऱ्या रोहित शमनि कसोटी क्रिकेटमधील आपल्या पर्वाला पूर्णविराम दिल्यानंतर सहा दिवसांतच विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यामुळे भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. रोहित आणि विराट म्हणजेच 'रोको' असे गौरवाने बोलले जायचे. आता कसोटी क्रिकेटमध्ये हा शब्द इतिहासजमा होणार आहे. या दोघांनी टी-२० क्रिकेटमधून अगोदरच निवृत्ती स्वीकारली आहे. त्यामुळे रोहित आणि विराट आता केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळताना दिसतील. कसोटी क्रिकेटमधून विराट निवृत्त होणार, असे वृत्त काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध होत होते, परंतु त्यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. आज सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करून विराटने आपला अलविदा जाहीर केला. १२३ कसोटी खेळणाऱ्या विराटने ९२३० धावा फटकावताना ३० शतके आणि ३१ अर्धशतके केली आहेत. ४६.८५ ही त्याची कसोटीतील सरासरी अंतिम राहिली.
वानखेडेवर अखेरचा सामना
न्यूझीलंडविरुद्ध १ ते ३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान वानखेडे स्टेडियमवर झालेला कसोटी सामना विराट कोहलीसाठी भारतातील अखेरचा कसोटी सामना ठरला. या सामन्यात भारताला तीन दिवसांतच पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मायदेशात व्हाइटवॉश स्वीकारण्याची वेळ आली. विराटला पहिल्या डावात चार (धावचीत) आणि दुसऱ्या डावात एक एवढ्याच धावा करता आल्या होत्या.
कर्णधार म्हणूनही यशस्वी
विराटने ६८ सामन्यांत नेतृत्व केले. त्यातील ४० सामन्यांत विजय मिळवला, तर १७सामन्यांत पराभव झाला होता. या ४० विजयांमुळे विराट कोहली कसोटीतील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला होता. त्याने महेंद्रसिंग धोनी (६० सामन्यांत २७ विजय) सौरव गांगुली (४९ सामन्यांत २१ विजय) यांनाही मागे टाकलेले आहे. कसोटी विश्वात तो चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार आहे.
ब्ल्यू रंगाची कसोटी कॅप पहिल्यांदा परिधान कनून १४ वमचा प्रवास झाला पण हा प्रवास इतका मोठा होईल, असे वाटले नव्हते, याबा विचारही केला नव्हता पण या प्रकारात सातत्याने कस लागला, त्यामुळे मला घउनाही आले, अनुभवांची शिदोरी मिळत गेली आणि ती माझे आयुष्य पुढे नेणारी ठरली. पांढ-या रंगाच्या पोषाखात रखेळण्याचे वैयक्तिक सुख फारच वेगळे आहे. शांत आणि कठोर मेहनत आणि दिवसभराचे श्रम तसेच छोटे- छोटे काही क्षण कायमस्वरूपी जवळ राहतात, या प्रकारातून आता दूर जाणे मानसिकदृष्ट्या सोपे नाही पण हीच योग्य वेळही आहे. माझ्याकडे असलेले सर्वस्व मी दिले आहे आणि मी विचारही केला नाही तेवढे मला परत मिळाले आहे.
आता कृतज्ञतेने आणि भरलेल्या मनाने मी पुढचा प्रवास सुरू केला आहे. ज्यांच्यासोबत मी मैदानावर रनेळलो आणि या प्रवासात सोबत मिळालेल्या प्रत्येकाचा मी आभारी आहे. कसोटीतील या माझ्या कारकीर्दीकडे मी नेहमीच स्मितहास्थाने पाहत राहीन.
२६९ निरोप घेतोय... (२६९ हा विराटचा कसोटीतील क्रमांक आहे.)
दिग्गजांच्या प्रतिक्रिया
आयसीसी प्रमुख जय शहा यांनी विराट कोहलीच्या कसोटीतील योगदानाबद्दल मत व्यक्त केले. ते म्हणाले, “कसोटीतील देदीप्यमान कारकीर्दीसाठी अभिनंदन... टी-२० क्रिकेट उदयास येत असताना कसोटी क्रिकेट जिवंत ठेवलेस... शिस्त, तंदुरुस्ती अन् वचनबद्धता याचे उतम उदाहरण तुझ्या रूपात पाहायला मिळाले.”
विराट कोहलीचा मित्र व आयपीएलमधील बंगळूर संघातील सहकारी ए. बी. डिव्हीलियर्स याच्याकडूनही कौतुक करण्यात आले. तो म्हणाला, “महान कसोटी कारकीर्द घडवणाऱ्या विराटचे अभिनंदन... तुझा दृढ निश्चय व कौशल्य नेहमीच मला प्रेरणा देत राहिले... क्रिकेटचा खरा लिजंड.”
टीम इंडियातील एकेकाळचा सहकारी अजिंक्य रहाणे यानेही विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणाला की, “तुझ्यासोबत मैदानात घालवलेला प्रवास लक्षणीय होता... एकत्र खेळत असताना छान आठवणी आहेत... चांगल्या भागीदारीही स्मरणात आहेत... कसोटीत अविस्मरणीय कारकीर्द घडवल्याबद्दल शुभेच्छा.”
युवराज सिंग म्हणाला, “कसोटी क्रिकेटने तुझ्यातील लढाऊ वृत्ती बाहेर आली. तूही कसोटी क्रिकेटला सर्व काही दिलेस. हृदयातील भूक, पोटातील आग अन् प्रत्येक पावलावर अभिमान अशा महान खेळाडूंप्रमाणे तू खेळलास. कसोटी क्रिकेटला दिलेल्या योगदानाचा अभिमान आहे.”
चेतेश्वर पुजारा म्हणाला, “अविश्वसनीय व अभिमान वाटेल अशी कसोटी कारकीर्द घडवल्याबद्दल विराटचे अभिनंदन ! कसोटी क्रिकेटबद्दलचे तुझे वेड प्रेरणा देणारे ठरले! देशासाठी खेळताना तुझ्यासोबत मैदान शेअर करणे हा माझ्यासाठी सन्मान होता! तुझ्यासोबत केलेल्या भागीदारी व आठवणी जपून ठेवेन.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter