आमिर खानचे ५९वे बर्थ डे सेलिब्रेशन

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Months ago
५९वे बर्थ डे सेलिब्रेट करताना आमीर खान
५९वे बर्थ डे सेलिब्रेट करताना आमीर खान

 

 बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा आज ५९ वा वाढदिवस आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण आमिरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आमिरनं त्याचा वाढदिवस एक्स वाईफ किरण राव, लापता लेडिज चित्रपटाची टीम आणि पापाराझीसोबत त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या ऑफिसमध्ये साजरा केला. आमिरच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान आमिर खानने उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले. त्याने 'लापता लेडिज' चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले.

बर्थ-डे सेलिब्रेशन दरम्यान केक कापल्यानंतर आमिर खानने स्वत: एक्स वाईफ किरण रावला केक भरवला. तसेच लापता लेडिज सिनेमातील कलाकार स्पर्श, प्रतिभा आणि नितांशी यांना देखील त्यानं केक दिला.

पाहा व्हिडीओ :
'लापता लेडिज' या सिनेमाचं दिग्दर्शन किरण रावनं केलं आहे. नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन यांनी या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली आहे. सलमान खान, सचिन तेंडुलकर आणि अनुराग कश्यप यांनी सोशल मीडियावर या सिनेमाचा रिव्ह्यू शेअर करुन या सिनेमाचं कौतुक केलं.

आमिरच्या 'या' चित्रपटांना मिळाली प्रेक्षकांची पसंती
आमिर खाननं 'कयामत से कयामत तक', 'दिल' आणि 'राजा हिंदुस्तानी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. या चित्रपटांमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच 'लगान', 'तारे जमीन पर', आणि 'दंगल' या त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

आमिरचे आगामी चित्रपट
सितारे जमीन पर असे हा आमिरचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाबद्दल आमिरनं एका मुलाखतीमध्ये संगितलं होतं. तो म्हणाला होता, "मी या चित्रपटाबद्दल अजून जाहीरपणे बोललो नाही.आताही मी जास्त बोलू शकणार नाही. पण चित्रपटाचे फक्त टायटल सांगतो. सितारे जमीन पर असे या चित्रपटाचे नाव आहे. तुम्हाला माझा 'तारे जमीन पर' हा चित्रपट आठवला असेल आणि या चित्रपटाचे नाव सितारे जमीन पर आहे कारण त्याच थीमवर हा चित्रपट आहे. तारे जमीन पर हा भावनिक चित्रपट होता. हा चित्रपट तुम्हाला हसायला लावेल. हा चित्रपट तुम्हाला रडवले, हा चित्रपट तुमचे मनोरंजन करेल."