आता आमिरच्या कलाकृती दिसणार एकाच वाहिनीवर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
अभिनेता आमिर खान
अभिनेता आमिर खान

 

अभिनेता आमिर खानने नुकतेच 'आमिर खान टॉकीज' नावाचे नवे डिजिटल चित्रपटगृह सुरू केले आहे. ही एक स्वतंत्र यूट्युब वाहिनी असून, प्रेक्षकांना त्यावर आमिर खाननिर्मित चित्रपट आणि लघुपट पाहता येणार आहेत. या वाहिनीची सुरुवात 'जनतेचा दरबार' या विचारप्रवर्तक लघुपटाने झाली आहे. 

समाजातील विषमता, लोकशाही व्यवस्था आणि सामान्य जनतेच्या व्यथा यावर भाष्य करणारा हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. 'आमिर खान टॉकीज' ही संकल्पना आमिर खानने स्वतः साकारली असून, त्यामागचा हेतू म्हणजे दर्जेदार आणि आशयप्रधान सिनेमा संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांपर्यंत विनामूल्य पोहोचवणे. या उपक्रमातून गावागावातील प्रेक्षकांनाही दर्जेदार चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, या वाहिनीवर लवकरच इतरही लघुपट, माहितीपट तसेच नवोदित दिग्दर्शकांच्या कलात्मक सर्जनशीलतेला वाव देणारे चित्रपट प्रसारित केले जाणार आहेत.