भारतीय संगीतविश्वाला जागतिक ओळख मिळवून देणारे प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाचा पुरस्कार मिळणार आहे. त्यांच्या संगीत कारकिर्दीतील योगदानाची दखल घेत लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय मुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आले आहे. हा पुरस्कार काल चेन्नई येथे झालेल्या लक्ष्मीनारायण जागतिक संगीत महोत्सव २०२५ या कार्यक्रमात प्रदान केला गेला.
लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा कला क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय काम करणाऱ्या दिग्गज कलाकारांना दिला जातो. हा कार्यक्रम लक्ष्मीनारायण जागतिक संगीत महोत्सवच्या ३५ व्या वर्षाची सुरुवातही ठरणार आहे. ए. आर. रेहमान यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील संगीताचा चेहरामोहरा बदलला. 'रोजा', 'बॉम्बे', 'दिल से', 'ताल','लगान', 'स्लमडॉग मिलियनिअर' आणि 'मोहेंजोदडों' यांसारख्या चित्रपटांतील त्यांचे संगीत आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ज़्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक चित्रपटांसाठी संगीत दिले आहे.
रोजा' या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांनी आणखी सहा राष्ट्रीय पुरस्कार पटकावले. पद्मश्री आणि पद्मविभूषण या नागरी सन्मानांनीही त्यांना गौरवण्यात आले.