बॉलीवूडच्या भवितव्याविषयी इम्तियाज अलीचे मोठे विधान

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Months ago
प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली
प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली

 

बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अलीनं केलेलं मोठं वक्तव्य हे आता चर्चेत आलं आहे. सध्या तो त्याच्या अमर सिंह चमकीला नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा असून तो आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इम्तियाज हा ओटीटीवरुन कमबॅक करणार आहे.

आदिती पोहनकरची शी, डॉ. अरोरा यानंतर अमर सिंह चमकीला नावाच्या चित्रपटातून इम्तियाज हा आता वेगळ्या भूमिकेतून समोर येतो आहे. यापूर्वी त्याच्या चित्रपटाच्या व्हायरल फर्स्ट लूकनं नेटकऱ्यांना, चाहत्यांना जिंकून घेतले होते. या सगळ्यात इम्तियाज हा नेहमीच त्याच्या परखड वक्तव्यासाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी म्हणून ओळखला गेला आहे.

एका मुलाखतीमध्ये इम्तियाज अलीनं प्रेक्षक हे नेहमीच बॉलीवूडविषयी जे बोलत असतात त्याविषयी ठणकावून प्रतिक्रिया दिली आहे.त्यामुळे तो चर्चेत आला आहे. आपले प्रेक्षक नेहमीच काही चित्रपटांना उद्देशून आता बॉलीवूडचे चित्रपट चालणार नाहीत, बॉलीवूड आता बंद होणार अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसतात. याकडे इम्तियाज अलीनं लक्ष वेधले आहे.

चित्रपट बंद होणार अशी भाषा करणाऱ्यांना इम्तियाज अलीनं गप्प केलं आहे. त्यांना त्यानं जशास तसं उत्तर दिलं आहे. रॉकस्टार सारख्या चित्रपटातून आपली भूमिका ठामपणे मांडणाऱ्या दिग्दर्शकानं लोकांची चित्रपटाविषयीची मानसिकता आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याविषयी त्याचं मत व्यक्त केलं आहे. इम्तियाजनं २०२२ मध्ये त्याच्या शी नावाच्या वेबसीरिजमधून ओटीटीवर डेब्यू केलं होतं.

सध्या त्यानं त्याच्या ओटीटीवर येणाऱ्या अमर सिंह चमकीला नावाच्या चित्रपटासंबंधी बोलताना म्हटलं आहे की, लोकं ओटीटी आला तरी म्हणतात की, चित्रपट बंद होणार, बॉलीवूडवर त्याचा परिणाम होणार, यावर इम्तियाजनं प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं म्हटलं आहे की, सिनेमा कधीही बंद होणार नाही.

इम्तियाज हा नुकताच फिक्की फ्रेम २०२४ चा भाग झाला होता. त्यानं डीएनशी बातचीत करताना म्हटलं की, मी कित्येकदा ऐकलं आहे की, आता बॉलीवूड चालणार नाही. मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हाही लोकांनी म्हटलं होतं थिएटर संपलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा व्हीसीआर आला होता त्यावेळी लोकांनी म्हटलं होतं. कलर टीव्ही आला तेव्हाही लोकांचं मत असचं होतं.

कित्येकवेळा लोकांनी म्हटलं आहे सिनेमा बंद होणार. पण तसं झालं नाही. चित्रपट कधीही बंद होणार नाही. आपण जे सभोवताली पाहतो आहे त्याचे प्रतिबिंब हे चित्रपटात दिसते. आणि ते मेकर्स आपल्यासमोर सादर करतो. इम्तियाजच्या नव्या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास त्याचा अमर सिंह चढ्ढा नावाचा चित्रपट येत्या १२ एप्रिल रोजी ओटीटीवर रिलिज होणार आहे. पंजाबचे प्रसिद्ध गायक अमर सिंह चमकीला यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.