रमशा फारुकी : शहरातल्या मुलीने जिंकलं गावचं मैदान

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 2 Months ago
रमशा फारुकी फोटो
रमशा फारुकी फोटो

 

छोट्या पडद्यावरील ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या शोमध्ये शहरातील काही मुलींनी गावात जाऊन विविध टास्क केले. हे टास्क करताना या मुलींना विविध अडचणींचा सामना करावा लागला. काल (11 फेब्रुवारी) ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला आहे. रशमा फारुकीनं ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी रशमावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

काल (11 फेब्रुवारी) ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या सोहळ्याला महेश मांजरेकर आणि आदेश बांदेकर यांनी हजेरी लावली. महेश मांजरेकर यांनी ) ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाच्या विजेतीच्या नावाची घोषणा केली. रशमा फारुकी ही ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाची विनर ठरली. रशमाला 20 लाखांचा चेक आणि ट्रॉफी देण्यात आली.

‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनची विजेती रशमा फारुकीवर आता शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रशमानं सोशल मीडियावर ग्रँड फिनालेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करुन रशमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

रशमानं जाऊ बाई गावात या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, "तुमच्या सर्वांची लाडकी रमशा आज तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बनली आहे गावची लाडकी लेक"