इम्रान हाश्मी पहिल्यांदाच दिसणार 'या' विशेष भूमिकेत

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Months ago
इम्रान हाश्मी
इम्रान हाश्मी

 

प्रसिद्ध दिग्दर्शक कन्नन अय्यर दिग्दर्शित वास्तव घटनांवर आधारित ए वतन मेरे वतन नावाचा चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. तो या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यातील इम्रान हाश्मीच्या लूक्सची चर्चा होताना दिसत आहे. त्यात आघाडीची अभिनेत्री सारा अली खान देखील दिसणार आहे.

इम्रान हाश्मीचा तो फर्स्ट लूक व्हायरल...
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा ए वतन मेरे वतन नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. याच महिन्यात तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यातील इम्रान हाश्मीच्या लूक्सचे कौतुक होताना दिसत आहे. इम्रान हा पहिल्यांदाच एका राजकीय व्यक्तिरेखेत दिसणार आहे. त्या पोस्टरनं लक्ष वेधून घेतले आहे. इम्रानच्या त्या फोटोंवर चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे.

या भूमिकेत दिसणार इम्रान हाश्मी...
प्राईम व्हिडिओने जो पोस्टर शेयर केला आहे त्यामध्ये म्हटले आहे की, स्वतंत्रतेच्या आवाजाला आणखी सशक्त बनविण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. स्वातंत्र्यतेचा आवाज सगळीकडे पोहचवणं गरजेचं होतं. इम्राननं त्याच्या बॉलीवूड करिअरमध्ये पहिल्यांदाच अशा इतक्या वेगळ्या प्रकारची भूमिका साकारली आहे. त्यानं यापूर्वी क्रिकेटर, गँगस्टर, महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलीस अधिकारी यांच्या भूमिका साकारल्या आहेत.

इम्रानच्या भूमिकेविषयी बोलायचं झाल्यास त्यानं राम मनोहर लोहिया यांची भूमिका साकारली आहे. त्याच्यासाठी ही एक मोठी गोष्ट असून यावेळी त्यानं ती भूमिका साकारताना कोणत्या प्रकारची तयारी करावी लागली याविषयी देखील सांगितलं आहे. लोहिया यांची भूमिका करणे ही एक वेगळ्या सन्मानाची बाब म्हणावी लागेल. या चित्रपटाचा भाग होता येणं ही आनंदाची बाब असल्याचे इम्राननं म्हटले आहे.

केव्हा होणार प्रदर्शित?
सारा अली खान आणि इम्रान हाश्मी यांच्या बरोबरच ए वतन मेरे वतन च्या कलाकारांशिवाय सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, अॅलेक्स ओनील आणि आनंद तिवारी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न होता ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर २१ मार्च रोजी २०२४ प्रदर्शित होणार आहे.