मुंबईत सना खान आणि अनस सय्यद यांनी घेतली केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांची भेट!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 14 h ago
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजीजू यांच्यासमवेत सना खान आणि तिचे पती इस्लामिक स्कॉलर अनस सय्यद
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजीजू यांच्यासमवेत सना खान आणि तिचे पती इस्लामिक स्कॉलर अनस सय्यद

 

सना खान आणि तिचे पती इस्लामिक स्कॉलर अनस सय्यद यांनी नुकतीच मुंबईत 'रौनक-ए-रमजान सीझन २' या आध्यात्मिक दूरदर्शन कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान केंद्रीय अल्पसंख्याक कार्य आणि संसदीय कार्य मंत्री किरेन रिजीजू यांची भेट घेतली. गोरेगाव येथील फ्युचर स्टुडिओमध्ये ही भेट झाली. रिजीजू यांनी या कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती.

किरेन रिजीजू यांनी याबाबत पोस्ट करत माहिती दिली. ते म्हणाले की,  "मुंबईतील गोरेगाव येथील फ्युचर स्टुडिओमध्ये 'रौनक-ए-रमजान सीझन २' च्या चित्रीकरणासाठी पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याबद्दल आनंद वाटला. अनस सय्यद जी आणि सना खान यांच्याशी छान संवाद झाला. भेटीदरम्यान अभ्यासपूर्ण चर्चा झाली. संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा. रमजान मुबारक!"
या भेटीतील संवाद अतिशय जिव्हाळ्याचा आणि विचारांना चालना देणारा होता. रमजान महिन्याचे महत्त्व, सांस्कृतिक मूल्ये रुजवण्यासाठी माध्यमांची भूमिका आणि सामाजिक सलोख्याचे महत्त्व या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.'रौनक-ए-रमजान' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अध्यात्म, दानधर्म आणि परंपरांच्या माध्यमातून पवित्र महिन्याचे सार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.