सारा अली खान अजमेर शरीफ दर्ग्यात गेली भेटीस

Story by  आवाज़ मराठी | Published by  vivek panmand • 9 d ago
सारा अली खान
सारा अली खान

 

अभिनेत्री सारा अली खान सध्या चर्चेत आहे. ती विकी कौशल सोबत जरा हटके जरा बचके सिनेमात झळकणार आहे. सारा आणि विकीच्या या आगामी सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

 
सारा अली खान पुन्हा एकदा चर्चेत आलीय. साराने रविवारी राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली.
 
अजमेर शरीफ दर्ग्याला साराच्या भेटीचा एक व्हिडिओ समोर आलाय. यात साराला पाहण्यासाठी तिचे फॅन्स गर्दी करताना दिसत आहेत.
 
दर्ग्यात साराने मिंट ग्रीन सलवार सूट घातला होता. तिने डोक्यावर दुपट्टा घातला होता आणि सनग्लासेस लावला होता. पापाराझी अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सारा दर्ग्याच्या भिंतीला धागा बांधून प्रार्थना करताना दिसत आहे.
 
ती दर्ग्याच्या आवारात जात असताना अनेक चाहत्यांनी तिला घेरलेले दिसले. तिच्यासोबत तिचे बॉडीगार्डही दिसले. याशिवाय एका फोटोमध्ये, सारा तिच्या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी आशीर्वाद मागताना हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे.
 
सारा वारंवार विविध प्रसंगी मंदिरे आणि दर्ग्यांना भेट देताना दिसते. 2021 मध्ये सारा तिची आई अमृता सिंगसोबत अजमेर शरीफ दर्गाला गेली होती. 
 
सारा अली खान आणि विकीची भूमिका असलेला जरा हटके जरा बचकेचा ट्रेलर प्रदर्शित होताच तो सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
 
काहींनी तर या दोन्ही सेलिब्रेटींना तुमचा हा चित्रपट तरी बॉक्स ऑफिसवर चालेल अशी अपेक्षा आहे अशी टोमणाबाजी त्यांना सुरु केली आहे. याचे कारण सारा अली खानच्या यापूर्वीच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.
 
जियो स्टुडिओ आणि दिनेश विजन यांनी जरा हटके जरा बचके या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रसिद्ध दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.
 
त्याच्या लेखनाची जबाबदारी देखील उत्तेकर यांनी पार पाडली आहे. विकी कौशल, सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट दोन जुन रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.