५ ऑगस्ट २०२३ हा दिवस भारताच्या चांद्रयान-३ साठी महत्वाचा दिवस असणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी सांगितलं की चंद्रयान-३ने चंद्राच्या दिशेने दोन तृतीयांश प्रवास पूर्ण केला आहे. हे यान चंद्राच्या जवळ पोहोचलं आहे. अंदाजे ४० हजार किलोमीटर अंतरावर असताना चंद्र या यानाला आपल्या गुरुत्वाकर्षाणाच्या शक्तीने आपल्या दिशेने खेचेल. चांद्रयान देखील चंद्राच्या कक्षेत स्थापित होण्याचा प्रयत्न करेल.
चांद्रयान-३साठी शनिवार(दि.५ ऑगस्ट)हा दिवस महत्वाचा ठरणार आहे. इसरो वैज्ञानिकांनी विश्वास दर्शवलाय की चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत स्थापन होण्यास यशस्वी होईल. ५ ऑगस्टला संध्याकाळी अंदाजे ७ वाजता चंद्रयान-३चे लुनार ऑर्बिट इंजेक्शन केले जाईल. म्हणजेचं चांद्रयान चंद्राच्या पहिल्या कक्षेत स्थापित होईल.
६ ऑगस्टला रात्री ११ वाजेच्या आसपास चांद्रयानाला चंद्राच्या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये टाकले जाईल. ९ ऑगस्टच्या दुपारी पाऊणे दोन वाजता तिसरी ऑर्बिट मॅन्युवरिंग होईल. १४ ऑगस्टला दुपारी १२ वाजताच्या आसपास चौथी आणि १६ ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजता पाचवा लुनार ऑर्बिट इंजेक्शन होईल. १७ ऑगस्टला प्रोपल्शन मोड्यूल आणि लॅंडर मोड्यूल वेगळे होतील.
१७ ऑगस्टला चांद्रयानला चंद्रापासून १०० किलोमीटर लांब असलेल्या कक्षेत टाकलं जाईल. १८ आणि २० ऑगस्टला डीऑर्बिटींग केली जाईल. म्हणजेचं चंद्राच्या कक्षेपासूनचे अंतर कमी केले जाईल. लॅंडर मोड्युल १००x३० किलोमीटरच्या ऑर्बिटमध्ये जाईल. त्यानंतर २३ ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी चंद्रावर लॅंड केलं जाईल. मात्र, अजूनही १९ दिवसांचा प्रवास अजून शिल्लक आहे. चांद्रयानासमोर काही समस्या येऊ शकतात.
रेडिएशन, अंतराळामध्ये धुळीपासून वाचण्यासाठी कवच
चांद्रयान-३ च्या चारही बाजूला सुरक्षा कवच लावण्यात आले आहेत. जे अंतराळात प्रकाशाच्या वेगाने फिरणाऱ्या सबअटोमिक कणांपासून वाचवतं. या कणांना रेडिएशन म्हटलं जातं. जेव्हा एक कण सॅटेलाईटशी धडकतो तेव्हा तो तुटतो आणि यातून निघणारे कण सेकंडरी रेडिएशन निर्माण करतात. यामुळे सॅटेलाईट आणि आंतराळयानावर प्रभाव पडतो.