TRAIने मोबाईल ग्राहकांना दिला 'हा' मोठा दिलासा

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अनेकदा लोक त्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी दुय्यम सिम ठेवतात. म्हणून, नंबर डिस्कनेक्ट किंवा बंद होण्यापासून रोखण्यासाठी, तो रिचार्ज करत राहावे लागतो. पण रिचार्ज प्लॅन महाग झाल्यामुळे दुय्यम सिमवर पैसे खर्च करणे थोडे कठीण झाले आहे. शा देशभरातली कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) २०२५मध्ये सिम कार्ड व्हॅलिडिटीसाठी नवीन नियम जारी केले आहेत. हे नियम Reliance Jio, Airtel, Vodafone Idea (Vi) आणि BSNL सारख्या टेलिकॉम प्रोव्हायडरला लागू होतील. 

ट्रायच्या नियमांनुसार, जर तुमचा नंबर ९० दिवस निष्क्रिय राहिला आणि २० रुपये प्रीपेड शिल्लक असेल, तर कंपनी तुमचे २० रुपये कापून ३० दिवसांची वैधता वाढवेल. म्हणजे तुमचा नंबर एकूण १२० दिवस सक्रिय राहू शकतो. अशाप्रकारे, तुम्ही दुय्यम सिम ठेवल्यास, त्यात २० रुपये शिल्लक ठेवल्यानंतर, तुम्ही रिचार्ज संपल्यानंतर १२० दिवसांपर्यंत सिम कार्ड सक्रिय ठेवू शकता. 

या १२० दिवसांनंतर सिम कार्ड वापरकर्त्यांना त्यांचा नंबर पुन्हा सक्रिय करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. मात्र, जर एखाद्या वापरकर्त्याने या १५ दिवसांतही आपला नंबर सक्रिय केला नाही, तर त्याचा नंबर पूर्णपणे निष्क्रिय केला जाईल आणि नंतर तो नंबर दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केला जाईल.