समाज
मुस्लीम समाजाचे ‘फ्यूचर’ घडवणारे फाऊंडेशन
भक्ती चाळक
मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक मागासलेपणाला आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कारणे आहेत. मुस्लिम समाजातील मुलांसाठी शिक्षणातील अडथळा म्हणजे दारिद्र्य! देशात शिक्षण हक्क कायदा झाल्यानंतरही मुस्लिम समाजातील हजारो मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत.
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सच्चर समिती, महाराष्ट्र सरकारने स्...