रिलायन्स जिओचा आणखी एक लॅपटॉप लाँचसाठी सज्ज झाला आहे. हा लॅपटॉप स्मार्टफोनपेक्षाही कमी किंमतीत हा लॅपटॉप उपलब्ध होईल. आज 31 जुलैला हे जिओबुक लाँच होणार आहे. हा एक 4G लॅपटॉप असणार आहे.
इ-कॉमर्स वेबसाईट अमेझॉनवर याची विक्री होईल. अमेझॉनने आपल्या वेबसाईटवर यासाठी 'नोटिफाय मी' बटणही दिलं आहे. या लॅपटॉपमध्ये काय फीचर्स असू शकतात याबाबत माहिती समोर आली आहे.
काय असणार फीचर्स
'जिओबुक 2023' मध्ये ऑक्टा कोअर प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. तसंच, याचं वजन एक किलोपेक्षा कमी (990 ग्रॅम) असणार आहे. याची बॅटरी ऑल-डे-लास्टिंग असणार आहे असा दावा कंपनीने केला आहे. यासोबतच या लॅपटॉपमध्ये 4G कनेक्टिव्हिटी मिळेल.
जिओ ओएस
या लॅपटॉपमध्ये JioOS देण्यात येणार आहे. जिओची ही स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तसंच, या लॅपटॉपमध्ये काही प्री-लोडेड अॅप्सदेखील देण्यात येणार आहेत. ब्लू आणि ग्रे अशा दोन रंगांमध्ये हा लॅपटॉप उपलब्ध असेल.
किंमत
JioBook 2023 या लॅपटॉपची अधिकृत किंमत अद्याप समोर आलेली नाही. मात्र, ही किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे. जिओने गेल्या वर्षी आपला पहिला लॅपटॉप 'JioBook' लाँच केला होता. यामुळे आता नवीन व्हर्जनकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.