कोरोनानंतर चीनमध्ये वेगाने पसरतेय नवा रोग

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 5 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

कोरोना संकटातून नुकतेच बाहेर पडलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा महामारीचं संकटं घोंगावत आहे. चीनमधील शाळांमध्ये वेगाने हा आजार पसरत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. हा एका प्रकारचा गूढ न्यूमोनिया असून मुलांना रुग्णालयात भरती करावे लागत आहे. ज्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढला आहे. कोरोना काळात झाल्याप्रमाणेच रुग्णालयात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. स्थानिक मीडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार यामुले अनेक शाळा बंद करण्यात येणार आहेत.

चीनमधील परिस्थिती कोरोनाच्या सुरुवातीच्या परिस्थितीप्रमाणे बनत चालली आहे. रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या अचानक प्रचंड वाढली वाढली आहे. ५०० मैल उत्तर-पूर्वेच बीजिंग आणि लियाओनिंग येथील रुग्णालयात आजारी मुलांची संख्या झपाट्याने वाढत आङे. येथे रुग्णालयातील संसाधनांवर यामुळे ताण वाढत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेकडून या आजाराबद्दल चीनकडून माहिती मागवल्याचे वृत्त समोर आले आहे.

लक्षणं काय आहेत?
या आजाराने ग्रस्त मुलांच्या फुफ्फुसात सूज येणे आणि तीव्र ताप यासह असामान्य लक्षणे दिसून येतात. परंतु खोकला आणि फ्लू, आरएसव्ही आणि श्वसनाच्या इतर आजारांशी संबंधित इतर लक्षणे आढळली नाहीयेत.

जगभरात मानवी आणि प्राण्यांच्या आजारांच्या उद्रेकावर लक्ष ठेवणाऱ्या ओपन ॲक्सेस सर्व्हेलन्स प्लॅटफॉर्म प्रोमेडने चीनमध्ये पसरणाऱ्या या गूढ न्यूमोनियाबाबत इशारा दिला आहे. यापूर्वी डिसेंबर २०१९ मध्ये आयएसआयने एका आजाराबाबत अलर्ट जारी केला होता, त्यानंतर सार्स-सीओव्ही-२ (Sars-CoV-२) च्या रूपात कोरोना महामारीने थैमान घातले होते.

श्वसनाचा अज्ञात आजार पसरण्याचा धोका असल्याचे प्रोमेडने दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे. मात्र, याला महामारी जाहीर करणे टाळले. याला महामारी म्हणणं घाईचं ठरेल, पण ते चिंताजनक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रोमेडने म्हटले आहे की, या रिपोर्टमध्ये श्वसनाच्या अज्ञात आजाराचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचे सूचित होत आहे. हे कधी सुरू झाले हे स्पष्ट नाही, कारण इतक्या लवकर मुलांवर परिणाम होणे असामान्य आहे. कोणत्याही प्रौढ व्यक्तीला याचा फटका बसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आलेले नाही.