कोविड लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञांना मिळाले नोबेल, कोण आहेत ते?

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 6 Months ago
कॅटालिन कॅरिको आणि ड्रयू वेसमन
कॅटालिन कॅरिको आणि ड्रयू वेसमन

 

२०२३ सालच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा सोमवारपासून सुरू झाली आहे. काल म्हणजेच २ ऑक्टोबर २०२३ रोजी, या वर्षीचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक कॅटालिन कॅरिको आणि ड्रयू वेसमन यांना फिजिओलॉजी किंवा मेडिसिन या क्षेत्रातील योगदाना बद्दल देण्यात आले. न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी संबंधित शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

कोण आहेत कॅटालिन कॅरिको?
कॅटालिन कॅरिकोचा जन्म १९५५ मध्ये जोलनोक, हंगेरी येथे झाला. त्यांनी १९८२ मध्ये जेगेड विद्यापीठातून पीएचडी केली. यानंतर त्यांनी हंगेरियन अकादमी ऑफ सायन्सेसमध्ये पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप पूर्ण केली.

यानंतर त्यांनी टेम्पल युनिव्हर्सिटी, फिलाडेल्फिया येथे पोस्ट-डॉक्टरेट संशोधन पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले.

२०१३ नंतर, Caitlin BioNTech RNA फार्मास्युटिकल कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष झाल्या. २०२१ मध्ये, त्यांनी कोविड काळात कोरोनासाठी mRNA लस विकसित केली.

कोण आहेत ड्रयू वेसमन?
ड्रयू वेसमन यांचा जन्म मॅसॅच्युसेट्समध्ये १९५९ मध्ये झाला. त्यांनी १९८७ मध्ये बोस्टन विद्यापीठातून पीएचडी आणि एमडी पदव्या मिळवल्या. यानंतर, त्यांनी हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या बेथ इस्रायल डेकोनेस मेडिकल सेंटरमध्ये क्लिनिकल प्रशिक्षण सुरू ठेवले.

१९९७ मध्ये, वेसमनने स्वतःचा संशोधन ग्रुप स्थापन केला. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील पेरेलमन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये त्यांनी संशोधन सुरू केले. सध्या ते पेन इन्स्टिट्यूट ऑफ आरएनए इनोव्हेशनचे संचालक आहेत.

पुढील नोबेल पुरस्कार कधी मिळणार?
३ ऑक्टोबर दुपारी ३.१५ वाजता: भौतिकशास्त्र
४ ऑक्टोबर दुपारी ३.१५ वाजता: रसायनशास्त्र
५ ऑक्टोबर दुपारी ४.३० वाजता: साहित्य
६ ऑक्टोबर दुपारी २.३० वाजता: शांती
९ ऑक्टोबर दुपारी ३.१५ वाजता: अर्थशास्त्र