हजरत पीर मंजन शह वली उर्सातून देण्यात आला सामाजिक ऐक्याचा संदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 d ago
हजरत पीर मंजन शह वली उर्सातून ऐक्याचा संदेश
हजरत पीर मंजन शह वली उर्सातून ऐक्याचा संदेश

 

शहरातील हजरत पीर मंजन शह वली (रहमतुल्ला अलै) यांचा उर्स मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. उर्समध्ये हिंदू मुस्लिम बांधव सहभागी झाल्याने सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले. 

शहरातील हा दर्गा प्रमुख धार्मिक स्थळ असून या ठिकाणी सर्व धर्म आणि जातीचे लोक मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात. उर्सनिमित्ताने लंगरचा (जेवण) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे यावर्षी बकरी ईद आल्याने शनिवारऐवजी रविवारी प्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांनी एकत्र येऊन वांग्यांची भाजी, वरण आणि बट्टीचा प्रसाद सर्वांना देण्यात आला. 

यामध्ये सर्वधर्मीय लोकांनी सहभाग घेतला. लंगरसाठी सलीम खान, जमशेर खान, अमजद खान, अय्युब खान, फिरोज खान, कादर खान, सरवर खान, मुख्तार शेख, अरमान शेख, गौस खान, शोएब शेख, शफी शेख, अजहर शेख, कमील शेख, जुबेर सय्यद, अख्तर सय्यद, अलीम शेख, जैनोद्दीन शेख, निसार पिंजारी, अकरम खान आणि इस्त्राईल शेख यांच्यासह अनेकांचे योगदान लाभले.