आर्थिक मदतीशिवाय पहलगाम हल्ला अशक्य

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 13 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

पहलगामसह अलीकडील काळात झालेले दहशतवादी हल्ले हे दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्यांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीशिवाय अशक्य होते, असा ठपका आंतरराष्ट्रीय आर्थिक कृती गटाने (एफएटीएफ) ठेवला आहे, तसेच दहशतवादाला आर्थिक पाठबळ देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करणान्या या गटाने यावर्षी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेधही केला आहे.

'एफएटीएफ'ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये पाकिस्तानचे नाव घेण्यात आले नसले तरी, दहशतवादाला मिळणारी आर्थिक मदत रोखण्यासाठी यंत्रणा निर्माण करणार असल्याचे म्हटले आहे. जे देश दहशतवादाला पाठबळ देतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच योग्य ती पावले उचलण्यात येतील आणि याबाबत लवकरच एक विस्तृत अहवालही सादर करण्यात येईल असे, या निवेदनात म्हटले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'एफएटीएफ'च्या वतीने फार क्वचित प्रसंगी दहशतवादी हल्ल्याचा अशा पद्धतीने निषेध केला जातो. यापूर्वी २०१५ आणि २०१९ मध्ये 'एफएटीएफ'च्या वतीने हल्ल्याचा निषेध करणारे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले होते. पाकिस्तानकडून दहशतवादाला सातत्याने पाठबळ देण्यात येत आहे, त्याचप्रमाणे पाकिस्तानला मिळणाऱ्या निधीचा वापर हा शस्त्रास्त्र खरेदीसाठी केला जात असल्याचा मुद्दा भारताच्यावतीनेने उपस्थित केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, 'एफएटीएफ ने पहलगाम हल्ल्याचा निषेध करणारे निवेदन प्रसिद्ध केल्याचे मानले जाते.  

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter