आता पेन्शनसाठी बॅंकेत खेटे घालण्याची गरज नाही

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सरकारने खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना लोकांच्या भविष्यात आर्थिक सुरक्षिततेसाठी अटल पेन्शन योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत लोकांना म्हातारपणात दर महिन्याला उत्पन्न मिळणार आहे. पेन्शन फंड आणि नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) ने याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे.

या योजनेत ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणे सोपे होणार आहे. योजनेत आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे सोपे होणार आहे. त्यामुळे नवीन सदस्य आणि नवीन युजर्संना योजनेत सहभागी होणे सोपे होणार आहे. ३१ जानेवारीला याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

PFRDA च्या परिपत्रकानुसार, सेंट्रल रेकॉर्ड किपिंग एजन्सी Protean e-Governance (PCRA) ने eAPY लाँच केले आहे. यामुळे सबस्क्रिप्शन प्रोसेस सोपी होणार आहे. यामध्ये आधार eKYC/XML/Virtual ID द्वारे डिजिटल नावनोंदणी प्रक्रिया पूर्वीपेक्षा सोपी होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज भासणार नाही. 
 
अटल पेन्शन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
अटल पेन्शन योजनेत अर्ज करण्यासाठी लोक तीन प्रकारे अर्ज करु शकतात. eAPY साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही. योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन XML- आधार कार्ड आधारित KYC, ऑनलाइन आधारित eKYC आणि व्हर्च्युअल आयडी या तीन पद्धतीने तुम्ही योजनेसाठी अर्ज करु शकतात.

ऑनलाइन अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा
eAPY नोंदणीमध्ये दिलेली माहिती तुमच्या बँक रेकॉर्डसारखीच असावी.

अटल पेन्श योजनेचा पहिला हप्ता भरण्यासाठी खात्यात शिल्लक रक्कम असणे आवश्यक आहे.

आधार कार्डमध्ये असलेले तुमचे नाव, जन्मतारीख बरोबर असावी.

इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज करु शकता
जर तुम्हाला कोणत्याही इंटरनेट बँकिंगद्वारे योजनेत अर्ज करायचा असेल तर या स्टेप्स फॉलो करा.

सर्वप्रथम बँकेच्या वेबसाइटवर लॉग इन करा.

त्यानंतर कस्टमर सर्व्हिसवर क्लिक करा. त्यानंतर सर्व्हिस रिक्वेस्ट वर क्लिक करा.

आपल्या बँक अकाउंटच्या सेक्शनमधून तुम्ही अटल पेन्शन योजनेत नावनोदणी करा.

यानंतर तुमची माहिती भरा आणि फॉर्म सबमिट करा. तुमचे अटल पेन्शन योजना खाते एका दिवसात उघडले जाईल.

अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्ही दरमहिना २१० रुपये भरुन सेवानित्तीनंतर दर महिन्याला ५ हजार रुपयांची पेन्शन मिळवू शकतात. या योजनेत १८ वर्षांवरील व्यक्ती अर्ज करु शकतात.या योजनेअंतर्गत वयाच्या ६० वर्षानंतर तुम्हाला नियमित पेन्शन मिळणार आहे.