'फॅटी लिव्हर'पासून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे ५ प्रभावी उपाय

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

डॉक्टर सिरियाक अ‍ॅबी फिलिप्स हे सोशल मीडियावर 'द लिव्हर डॉक' नावाने प्रसिद्ध आहेत. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लिव्हरच्या समस्यांवर टिप्स आणि उपाय सांगत असतात. नुकताच त्यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी ५ महत्त्वाच्या सवयी सांगितल्या आहेत, ज्यांच्या मदतीने फॅटी लिव्हर कमी होऊ शकते.

त्यांनी त्यांच्या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, "फॅटी लिव्हर कमी करण्यासाठी तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत ५ महत्त्वाच्या गोष्टी समाविष्ट करा." द लिव्हर डॉक यांनी सांगितल्यानुसार या सर्व उपायांना शास्त्रीय आधार आहे. प्रत्येक मुद्द्यासाठी वैज्ञानिक स्त्रोतही त्यांनी दिले आहेत. 

फॅटी लिव्हर कमी करण्यासाठी पुढील ५ उपाय :

साखर न घातलेली ब्लॅक कॉफी
रोज किमान ३ कप साखर न घालता ब्लॅक कॉफी प्यावी. प्रत्येक कपात ५ ग्रॅम इंस्टंट कॉफी किंवा १० ग्रॅम ब्रूव्ड कॉफी असावी. यामुळे फॅटी लिव्हर कमी होऊ शकतो.

एरोबिक व्यायाम
एरोबिक व्यायाम फॅटी लिव्हर कमी करण्यसाठी एक उत्तम उपाय आहे. डॉक्टरांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये सूचवले आहे की, हलका व्यायाम, जसे की चालणे, बागकाम, सायकल चालवणे किंवा धावणे हे आठवड्यातून १५० मिनिटे करणे आवश्यक आहे.

पुरेशी झोप 
फॅटी लिव्हर कमी करण्यासाठी रोज ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्त झोप घेणे शरीरासाठी हानिकारक होऊ शकते, असे 'द लिव्हर डॉक' म्हणतात.

मेडिटरेनियन आहार
राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या (NIH) मते, मेडिटरेनियन आहार हा संतुलित असतो. यामध्ये कमी संतृप्त फायबर आणि  प्रोटीन, जास्त अँटीऑक्सिडन्ट्स आणि फायबर्स असतात. 'द लिव्हर डॉक' म्हणतात की फॅटी लिव्हरवर नियंत्रण ठेवण्यासाठी फळं, भाज्या आणि कमी प्रक्रिया केलेला आहार घेतला पाहिजे. यामध्ये एक कॅलोरी डेफिसिट असावा आणि फायबर जास्त प्रमाणात असावे.

हायपोकॅलोरिक आहार
फॅटी लिव्हरसाठी हायपोकॅलोरिक डाएट म्हणजे किमान कार्बोहायड्रेट्स, मध्यम प्रमाणात फॅट्स आणि प्रोटीन असावा. उदाहरणार्थ, कार्बोहायड्रेट्स : फॅट्स : प्रोटीनचे प्रमाण ५०-६० : २०-२५ : २०-२५ असावे. तसेच, ३०% फॅट्स असावे, जे पिकलेल्या तेलांपासून मिळाले पाहिजेत.

तसेच डॉक्टरांनी सांगितले की, अप्रक्रिया/ताज्या लाल मांसाचे सेवन आठवड्यात १-२ वेळा ५०० ग्रामांपेक्षा कमी करावे. प्रोसेस्ड आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड मांसाचे सेवन मात्र कमी करावे, कारण त्याचे सेवन यकृत आणि हृदयाशी संबंधित विविध आजारांना कारणीभूत ठरू शकते.