अश्विनी आपटे खुर्जेकर
दिवाळी म्हणजे वर्षातला सगळ्यात मोठा साम प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. आपण हा सण 'घरामध्ये दिवे लावून, फटाके फोडून, मिठाई खाऊन आणि भेटवस्तू देऊन साजरा करत असतो. प्रत्येक घर उजळून निषतं. वातावरणात उत्साह असतो. प्रत्येक जण आपापल्या परीनं हा सण साजरा करत असतो. पण या सगळ्या गडबडीत आणि उत्साहाच्या वातावरणात काही फेस्टिव्ह एटीकेट लक्षात ठेवणं मात्र गरजेचं असतं. ज्यामुळे हा सण फक्त आपल्यांसाठीच नव्हे तर, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्यासाठी सुद्धा अधिक सुंदर आणि आनंददायी होईल.
चांगल्या वर्तनाची ताकद एटीकेट म्हणजे फक्त काटेकोर शिष्टाचार नव्हे, तर, इतरांच्या प्रती दाखवलेली संवेदनशीलता आणि आदर. सणाच्या वेळी आपण कुटुंब, मित्र, सहकारी आणि शेजारी यांच्याशी संवाद साधतो. अशावेळी नम्र भाषाशैली, अदबीने वागणे आणि इतरांच्या भावनांचा विचार करणे, ही सौजन्यपूर्ण वर्तणुकीची खून आहे, कोणाच्या घरी गेल्यावर वेळेचं भान ठेवणं, योग्य पोशाख घालणं, आदरातिथ्याबद्दल आभार मानणे, तुमच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, या छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठा फरक घडवतात.
या गोष्टी लक्षात ठेवा
१. चांगला यजमान बना: तुमच्या पाहुण्यांचे मनापासन स्वागत करा. त्यांना आनंददायी वाटेल याची काळजी घ्या, त्यांची वेळ, सोय आणि आवड लक्षात ठेवा,
२. सजग पाहुणे बना : तुम्ही ज्यांच्याकडे जात आहात, त्यांचा वेळ आणि जागेचा आदर करा. भेटवस्तू दिल्यावर धन्यवाद म्हणा. विनाकारण तुलना टाळा आणि घरी जात्तामा आदरातिथ्याचं छोटस कौतुक नक्की करा.
३. दिवाळी विचारशील साजरी करा: सण साजरा करताना इसराच्या सोयीचा, आरोग्याचा आणि पाँवराराचा विचार नक्की करा. आचाज आणि प्रदूषण कमी ठेवा. प्राण्यांची आणि वयोवृद्धांची काळजी घ्या. सजावट आणि फटाके यापेक्षाही संवेदनशीलता आणि आनंद जास्त महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा.
४. मनापासून शुभेच्छा द्या: थोडा वेळ काढून व्यक्तीशः शुभेच्छा द्या. समोरच्या माणसाला खास वाटेल, अशाप्रकारे संवाद साधा, कारण शब्दपिक्षा भाव महत्त्वाचा.
५. देणं आणि घेणं या दोन्हीत आनंद ठेवा: भेटवस्तू किमतीत नव्हे, तर भावनेत मोठी असते भेट देताना तिच्या उपयोगाचा आणि अर्थाचा विचार करा आणि भेटवस्तू मिळाल्यावर मनापासून धन्यवाद म्हणायला विसरू नका.
६. उपस्थित राहा: लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींक दूर ठेवा आणि या सांमध्ये मनाने सहभागी व्हा. सण म्हणजे गाल्यांचा उत्सव. त्यासाठी मनामी उपस्थित राहणं गरजेचं आहे.
७. तक्रारी किंवा नकारात्मक चर्चा टाळा: सणाच्या वातावरणात हसणं, कौतुक करणं आणि मनापासून आनंद साजरा करणं, हेच सर्वोत्तम डेकोरेशन आहे.
८. सणाचं सार जपा: उत्सव साजरा करताना, थकवा, ताण किंवा दिखावा नको. सण म्हणजे आत्मिक आनंद, त्यामुळे तो इतरांशी वाटा; पण स्वतःही मनापासून अनुभवा.
दिवाळीचा प्रकाश बाहेर पसरवण्याइतकंच महत्वाचं आहे तो प्रकाश आपल्या वर्तनात आणि संवादात आणाण, सण म्हणजे फक्त सजावट नव्हे, तर आपल्या व्यक्तिमत्त्वातीत सौजन्य, नम्रता आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे. या दिवाळीत बाहेरच्या दिव्यांसोबत आपल्या स्वभावाचा दीपही तेवू द्या कारण तोच खरा उत्सवाचा अर्थ आहे.