रमजान महिन्याची सुरुवात झाली असून दिवसभराच्या कडक उपवासानंतर शरीर पुन्हा हायड्रेटेड आणि उत्साही होणे गरजेचे असते. सूर्यास्तानंतर इफ्तारच्या वेळी केवळ पाणी पिण्यापेक्षा पोषक आणि चविष्ट पेये घेतल्यास शरीराला झटपट ऊर्जा मिळते. इफ्तारच्या दस्तखानची रंगत वाढवण्यासाठी आणि घरातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना तृप्त करण्यासाठी काही खास शाही पेये तुमच्या इफ्तारला एक वेगळीच गोडी देतील.
फालुदा
फालुदा हा केवळ एक गोड पदार्थ नसून रमजानसाठी हे एक चविष्ट आणि ताजेतवाने पेय आहे. दूध, गुलाबचा फ्लेवर, फालुदा शेव, सबजा बिया आणि आवडीचे टॉपिंग्स यांचे हे मिश्रण असत. याची अप्रतिम चव आणि त्यातील पोषक घटक पुढील जेवणापर्यंत तुमची भूक शमवण्यासाठी उत्तम आहेत. त्यामुळे इफ्तारसाठी तुम्हाला खरोखरच समाधानकारक आणि स्वादिष्ट पेय हवे असल्यास तुम्ही फालुदा निवडू शकता!
रोझ मिल्क
रोझ मिल्क तयार करण्यासाठी गुलाबाचा अर्क क्रीमयुक्त दुधात मिसळल्यामुळे घट्टपणा, गोडवा आणि फुलांच्या सुगंधाचा एक स्वर्गीय संगम तयार होतो. इफ्तारच्या सुरेख संध्याकाळी थकवा दूर करण्यासाठी हे हेल्दी पेय तुम्हाला नक्कीच मदत करेल.
इराणी चहा रेसिपी
तुम्ही कधी हैदराबादचा प्रसिद्ध इराणी चहा घेतला आहे का? हा चहा नेहमीच्या चहापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. या खास चहामध्ये खवा किंवा माव्याऐवजी दूध वापरतात. सुरुवातीला चहाचा डिकोक्शन तयार करा आणि दुसऱ्या बाजूला दूध उकळून घ्या. त्यानंतर दुधाचे हे क्रीमयुक्त मिश्रण चहावर ओता. अशा प्रकारे तयार झालेला हा चविष्ट चहा तुम्हाला पुन्हा पुन्हा हवासा वाटेल. तुम्हाला हवे असल्यास यात मसाले टाकू शकता, पण हा चहा साधा ठेवल्यास त्याची अस्सल चव मिळते.
बादाम दूध
बादाम दूध या पारंपारिक भारतीय पेयाचा आस्वाद घ्या. बदाम, दूध आणि वेलची-केशर यांसारख्या मसाल्यांच्या मिश्रणाने हे पेय तयार केले जाते. हिवाळ्यातील थंडीत किंवा उन्हाळ्यातील कडाक्यातही हे पेय आरोग्यदायी ठरते. विशेषतः इफ्तारच्या मेळाव्यांमध्ये हे पेय सर्वांच्या पसंतीचे असते.
बनाना डेट अँड नट स्मूदी
स्मूदीबाबत चोखंदळ असणाऱ्या लोकांनाही ही बनाना डेट अँड नट स्मूदी खूप आवडते. पिकलेल्या केळ्यांचा क्रीमयुक्त पोत आणि दुधाचे हे मिश्रण असून खजुराचा नैसर्गिक गोडवा आणि बदामाचा कुरकुरीतपणा यात भर घालतो. चविष्ट आणि आरोग्यदायी स्मूदी रमजानच्या मेनूमध्ये समाविष्ट करण्यासाठी उत्तम आहे. यामुळे तुमची चव आणि भूक दोन्ही तृप्त होतात.
व्हिएतनामी आईस्ड कॉफी
आग्नेय आशियातील लोकप्रिय पदार्थ असलेली व्हिएतनामी आईस्ड कॉफी हे रमजानमधील एक आवडीचे पेय आहे. ज्यांना ब्लॅक कॉफी आवडते अशांनाही हे पेय भुरळ घालते. कडक डार्क रोस्ट कॉफी मिळून गोड आणि क्रीमी पेय तयार केले जाते. केवळ चार घटक आणि तीन सोप्या पायऱ्या वापरून तुम्ही इफ्तारसाठी ही ताजेतवाने व्हिएतनामी आईस्ड कॉफी झटपट बनवू शकता.
मोहब्बत का शरबत
हे शरबत बनवण्यासाठी थंड दुधामध्ये कलिंगडाचे बारीक तुकडे, रोझ सिरप किंवा रूह अफजा आणि बर्फाचे खडे मिसळा. शरीराला अधिक थंडावा मिळण्यासाठी यामध्ये भिजवलेले सबजा बी देखील टाका आणि या चविष्ट पेयाचा आनंद घ्या.