मुक्ता आठवले
भारतातील उत्सवांमध्ये आपुलकीने भेटवस्तू देण्या-घेण्याची परंपरा आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, ख्रिसमस अशा प्रत्येक सणात्त आपण आप्तेष्टांना मिठाई, कपडे, दागिने, गृहोपयोगी वस्तु, सौंदर्यप्रसाधने अशा विविध भेटवस्तू देतो. पण या भेटींमागे मोठ्या प्रमाणात पॅकेजिंग कचरा निर्माण होतो, ज्याकडे आपण सहसा लक्ष देत नाही. आनंद साजरा करताना कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी पाळलो, तर आपल्या भेटी अधिक अर्थपूर्ण ठरू शकतात.
भेटवस्तू निवडताना 'उपयोगी' आणि 'पर्यावरणपूरक' या दोन बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. एकदाच वापरून फेकून द्याव्या लागणाऱ्या वस्तूंपेक्षा दीर्घकाळ वापरता येतील, अशा भेटवस्तू निवडणे महत्वाचे आहे. किंवा एकदाच सगळ्यांसोबत वाटून संपणारे आरोग्यपूर्ण खाद्यपदार्थदेखील भेटवस्तू म्हणून देता येतील, मधुमेहाची राजधानी असलेल्या आपल्या देशात वारंवार आपल्या जवळच्या माणसांना मिठाई देणे हा वचित पर्याय नाही.
भेटीतील मुख्य ऐवज जितका महत्त्वाचा तितकेच महत्वाचे त्याचे पॅकेजिंग मुख्य ऐवज आणि पॅकेजिंग पर्यावरणास कमीत कमी हानी पोहोचवणारे असावे. पर्यावरणदृष्ट्या सजग होऊन आपण कुंडीतील झार्ड, आरोग्यदायी खाद्यपदार्थाचे पॅक, कपट्यांच्या पुनर्वापरातून तयार केलेल्या पिशव्या, बांबू किंवा लाकडापासून बनवलेल्या उपयुक्त वस्तू, स्थानिक कारागिरांची हस्तकलाउत्पादने, किंवा पुस्तके अशा वस्तू व पॅकेजिंगचा नक्कीच विचार करू शकतो. अशा भेटवस्तू केवळ टिकाऊ नाहीत, तर स्थानिक उत्पादक आणि शेतकरी यांना आर्थिक आधार देतात.
सणासुदीच्या काळात पॅकेजिंगमधून सर्वाधिक कचरा निर्माण होतो. रंगीत कागद, प्लॅस्टिक रिवोन, थर्माकोल, चमकीचे कागद या वस्तू लगेच कचऱ्यात जातात. यासाठी पर्यायी उपराष म्हणजे वर्तमानपत्र, घरातील आकर्षक रंगीत वरखेवे, जुन्या डब्यांचा वापर, किंवा हाताने केलेले सोपे सजावटी प्रयोग जेणेकरून भेटवस्तू देतानाच आपण पॅकेजिंगचा पुनर्वापर करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो. या काळात कचरावेचकांवर अतिरिक्त ताण येतो. शहरातील प्रत्येक घरातून गोडधोड पदार्थाचे डबे, तेलकट पिशव्या, शिळे अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. हे सगळं गोळा करण्याचं काम कचरावेचकांना करावं लागतं. स्वच्छ न केलेले चॉक्स आणि उघडी पॅकेजिंग वस्तू कीटकांना आकर्षित करतात, मुंग्या, शुरळं, उंदीर यामुळे आरोग्य चोक्यात येते. प्रत्यक्षात आपल्या एका छोट्याशा कृतीमुळे हा धोका कमी होऊ शकतो. मिठाईचे बॉक्स रिकामे करून, धुऊन किंवा किमान कोरडे करूनच टाकले, तर कचरावेचकांना हाताळण्यास सोपे जाते. याशिवाय भेटवस्तूंसोबत मिळालेले पॅकेजिंग कचऱ्यात न मिसळता वेगळे टाकले तर तेसुद्धा वेगळे करून पुनर्चक्रीकरणासाठी पाठवणे सोयीचे असते.
कचरावेचक आपल्या शहरांना स्वच्छ ठेवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करतात. तरीसुद्धा समाजात त्यांचा सन्मान केला जात नाही. सणासुदीच्या काळात त्यांना आपल्या आनंदोत्सवात सामील करून घेतले तर सण अधिक अर्थपूर्ण होतो. त्याचप्रमाणे अतिरिक्त कामासाठी त्यांना नेहमीपेक्षा जास्त मोबदला देणेदेखील तितकेच महत्वाचे आहे. कचरावेचक हे आपल्या जीवनाचे न दिसणारे नायक आहेत त्यांच्यामुळेच कचरा हाताळणी सुरळीत होते. त्यांचा सन्मान करणे आणि त्यांचे श्रम कमी करण्यासाठी सजग वर्तन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
सण म्हणजे फक्त आनंदोत्सव नाही, तर सामाजिक जबाबदारीची आठवण करून देणारे निमित्त आहे. आपण दिलेली भेट जर पर्यावरणपूरक असेल, तर ती नेहमी लक्षात राहील. तसेच भेट मिळाल्यानंतर त्याचे पॅकेजिंग योग्य पद्धतीने टाकणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येक छोटासा प्रयत्न एकत्र आल्यावर मोठा बदल घडवू शकतो.
सणाच्या काळात आपण केवळ भेटवस्तूंचा विचार न करता, त्यामागे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचाही विचार करणे गरजेचे आहे. सजग भेटवस्तू निवडणे, पॅकेजिंगचा पुनर्वापर करणे आणि कचरावेचकांच्या आरोग्याचा तसेच सन्मानाचा विचार करणे या लहानशा कृतींनी आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. सण साजरा करण्याची खरी मजा म्हणजे आनंद वाटण्यासोबतच समाज आणि निसर्गाची काळजी घेणे. त्यामुळे या सणात 'शाश्वत भेटवस्तू' देऊन सगळ्यांचा उत्सव खऱ्या अथनि संस्मरणीय करूयात.