AIच्या जगात अंबानींच्या 'हनुमान'ची होणार एन्ट्री

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 3 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुढील महिन्यात (मार्च २०२४) 'हनुमान' हा ChatGPT सारखा AI चॅटबॉट लॉन्च करणार आहेत. ते तयार करण्यासाठी, कंपनी देशातील ८ आयआयटी विद्यापीठांसोबत हा चॅटबॉट तयार करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि देशातील ८ IITचे पाठबळ असलेल्या BharatGPT ग्रुपने मुंबईतील एका तंत्रज्ञान परिषदेदरम्यान हा AI चॅटबॉट प्रदर्शित केला. 

या कॉन्फरन्सदरम्यान एका व्हिडिओमध्ये, दक्षिण भारतातील एका मोटरसायकल मेकॅनिकने तमिळ भाषेत एआय बॉटशी संवाद साधला. याव्यतिरिक्त, एका बँकरने बॉटशी हिंदीमध्ये संवाद साधला आणि हैदराबादमधील एका व्यक्तीने संगणक कोड लिहिण्यासाठी बॉटचा वापर केला.

हनुमान AI मॉडेल कसे आहे?
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार या एआय मॉडेलला हनुमान असे नाव देण्यात आले आहे. जर हे मॉडेल यशस्वी झाले तर ते भारतासाठी AI च्या जगात मैलाचा दगड ठरेल.
 
आयआयटी बॉम्बेच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे अध्यक्ष गणेश रामकृष्णन म्हणाले की, हे एलएलएम (लार्ज लँग्वेज मॉडेल) आहे. लार्ज लँग्वेज मॉडेल हे मोठ्या डेटासेटचा वापर करून प्रशिक्षित केला जातो.

भारत जीपीटीचे हे मॉडेल हेल्थ केअर, गव्हर्नन्स, फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि एज्युकेशन या चार मुख्य क्षेत्रात ११ स्थानिक भाषांमध्ये काम करेल. हनुमान मॉडेल तयार करण्यात आयआयटी मुंबईचाही सहभाग आहे. याला Reliance Jio Infocomm Limited आणि भारत सरकारचाही पाठिंबा आहे. याशिवाय रिलायन्स जिओ ब्रेनवरही काम करत आहे.

मुकेश अंबानी जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत समावेश
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत सामील झाले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता ११४ अब्ज डॉलर (सुमारे ९.४५ लाख कोटी रुपये) झाली आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी या यादीत १० व्या क्रमांकावर आहेत आणि त्यांनी Google सह-संस्थापक सर्गे ब्रिन यांना मागे टाकले आहे.