भारतीय वंशाचा खेळाडू बनला अमेरिकेच्या क्रिकेट संघाचा कर्णधार

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 1 Months ago
अमेरिका क्रिकेट संघाचा कर्णधार मोनांक पटेल
अमेरिका क्रिकेट संघाचा कर्णधार मोनांक पटेल

 

यंदा टी-20 वर्ल्डकपचा थरार या वर्षी जूनमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी जोरदार तयारी केली आहे. जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये एकूण 9 मैदानांवर टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. त्याचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये यावेळी एकूण 55 सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना एक जून रोजी अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपची उपांत्य फेरी 26 आणि 27 जून रोजी खेळवली जाईल. पहिल्यांदाच अमेरिकन क्रिकेट संघही या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. अमेरिकन क्रिकेट संघाचा कर्णधार हा भारतीय वंशाचा मोनांक पटेल आहे.

कोण आहेत मोनांक पटेल?
भारतातील गुजरात राज्याचा राहणारा मोनांक पटेल टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार आहे. 2010 मध्ये मोनांकला अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळाले. त्यानंतर 2016 पासून पटेल अमेरिकेत राहू लागला. पटेल 2018 पासून अमेरिकेसाठी क्रिकेट खेळत आहे.

त्याच वर्षी, तो आयसीसी वर्ल्ड टी-20 अमेरिका क्वालिफायर स्पर्धेसाठी क्रिकेट खेळला आणि या दरम्यान त्याने सहा सामन्यांमध्ये एकूण 208 धावा केल्या. पटेल 2021 पासून अमेरिकेच्या संघाचे कर्णधार आहेत, आणि या वर्षीही ते अमेरिकेच्या संघाचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहेत.

यासोबत भारत सोडून अमेरिकेत गेलेल्या क्रिकेटपटू उन्मुक्त चंदचे टी-२० वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न भंग पावल्याचे दिसत आहे. या वर्ल्डकपपूर्वी अमेरिका कॅनडासोबत टी-२० मालिका खेळणार आहे. यूएस क्रिकेट बोर्डाने यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. उन्मुक्त चंदचा या संघात समावेश करण्यात आलेला नाही. टी-२० विश्वचषक यंदा जूनमध्ये खेळवला जाणार आहे.

यूएस संघ : मोनांक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स (उपकर्णधार), अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, गजानंद सिंग, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोष्टुश केंजिगे, सौरभ नेत्रावलकर, शेडली व्हॅन शाल्कविक , स्टीव्हन टेलर, उस्मान रफिक.