IPL 2024 : सहकलाकार ठरले शिल्पकार, म्हणून आरआरने केल्या 223 धावा पार

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 12 d ago
Ipl २०२४- KKR vs RR
Ipl २०२४- KKR vs RR

 

इडन गार्डनवर केकेआरच्या सुनिल नारायणनं शतकी खेळी केली. आयपीएलमधली ही त्यांची पहिलीच शतकी खेळी होती. हा धडाकेबाज फलंदाज केकेआरसाठी कायम हाणामारीची कामं करत आलाय. मात्र हाणामारी करता करता तो कधी शेवटपर्यंत जिवंत राहिलाय म्हणजे शतक ठोकलंय असं झालं नव्हतं. मात्र राजस्थान विरूद्ध त्यानं आपल्या नावासमोर एक शून्य शून्य आकडा लावलाच.

केकेआरनं राजस्थआनविरूद्ध 223 धावा केल्या. त्यात सुनिल नारायणच्या 109 धावांचं मोठं योगदान होतं. त्यानंतर केकेआरकडून सर्वाधिक धावा या अंगक्रिश रघुवंशीनं केल्या होत्या. त्यानं 18 चेंडूत 30 धावा ठोकल्या. तर रिंकू सिंगनं 9 चेंडूत 20 धावा ठोकत केकेआरला 220 चा टप्पा पार करून दिला.

राजस्थानच्या रन चेसमध्ये देखील अशाच शतकवीर बटलर सोडून दोन खेळाडूंनी छोटं मात्र अत्यंत महत्वाचं योगदान दिलं. हे योगदान केकेआरच्या रघुवंशी अन् रिंकू सिंगपेक्षा सरस ठरलं म्हणून आरआरनं 223 धावा केल्या पार!

राजस्थाननं ज्यावेळी या रन चेसचा पाठलाग सुरू केला त्यावेळी त्यांनी पॉवर प्लेमध्ये बेफिकीर खेळ केला. यात त्यांच्या दोन विकेट्सही गेल्या मात्र बक्कळ धावा देखील स्कोअरबोर्डवर जमा झाल्या. यावेळी बटलर कुठंच पिक्चरमध्ये नव्हता. सगळा फोकस हा रियान परागवरच होता. या पठ्ठ्यानं 242 च्या स्ट्राईक रेटनं 14 चेंडूत 34 धावा कुटल्या. यामुळं राजस्थान 8 व्या षटकापर्यंतच शतकाच्या जवळ आला होता.

राजस्थानला असा खेळ करणं भागच होतं. कारण केकेआरकडं सुनिल नारायण आणि वरूण चक्रवर्तीसारखे चिंगूस फिरकीपटू होते. हे धावा कमी देतात अन् विकेट्स जास्त घेतात. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. नारायण अन् चक्रवर्तीनं राजस्थानची मधली फळी कापून काढली.

राजस्थानची मधली फळी ढेर झाली त्यावेळी बटलरनं आपल्या अडखळत्या सुरूवातीचं रूपांतर अर्धशतकी खेळीत केलं होतं. दुसरीकडून रोव्हमन पॉवेलनं 16 चेंडूत 26 धावांची तडाखेबाज खेळी करत धावा अन् चेंडू यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला सामना खेळी तडीस नेता आली नाही. त्यानं अर्ध्यात बटलरची साथ सोडली.

आतापर्यंत आरआरचा पिक्चर सहकलाकारांनीच तारून नेला होता. अखेर सूर गवसलेल्या बटलरनंही आता आपल्याशिवाय आरआरला पर्याय नाही, आपणच या पिक्चरचे मेन हिरो आहोत, आता आपल्याला हिरोगिरी दाखवलायला पाहिजे हे जाणलं. त्यानं जास्तीजास्त स्ट्राईक आपल्याकडं ठेवत चेंडू टोलवायला सुरूवात केली.

राजस्थानला शेवटच्या सहा षटकात विजयासाठी 96 धावांची गरज होती. पॉवेलच्या छोट्या मात्र धडाकेबाज खेळीनंतर बटलरनं प्रत्येक षटकात जवळपास 17 - 18 धावा वसूल केल्या. त्यानं सामना जिंकून देण्याची सुरूवात ही 17 व्या षटकापासूनच केली होती. त्यामुळं शेवटच्या षटकात राजस्थाननं सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. ही पकड इतकी मजबूत होती. की बटलरला तीन चार बॉलवर एकही धाव न घेणं देखील परवडलं.

अखेर शेवटच्या चेंडूवर चौकार मारत बटलरनं राजस्थानला 223 धावा चेस करून दिल्या. दरम्यान त्यानं आपलं सातवं आयपीएल शतक देखील ठोकलं. आजच्या सामन्यात दोन शतकी खेळी झाल्या. सुनिल नारायणचं खास असं पहिलं वहिलं शतक अन् बटलरचं चेस करतानाचं काहींच अडखळतं मात्र शेवट एकमद फरफेक्ट करणारं शतक!

बटलरच्या शतकाचं कौतुक शाहरूखनं देखील केलं. त्यानं या सामन्याच्या हिरोला मिठी मारून त्याचं अभिनंदन केलं. मात्र बटलरचं शतक जितकं महत्वाचं होतं तितकचं महत्वाचं काम हे त्याचे सहकलाकार रियान पराग अन् रोव्हमन पॉवेल यांनी केलं. ज्यावेळी सामन्याचा हिरो संघर्ष करत होता त्यावेळी या दोन सहकलाकारांनी पिक्चर तारून नेला. त्यांच्या या गेस्ट अपिअरन्सला देखील टाळ्या पडल्याच पाहिजेत!