कलम ३७० रद्द होणार की कायम राहणार?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या याचिकांवर काल सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सर्व याचिका कोर्टानं दाखल करुन घेतल्या असून त्यावर २ ऑगस्टपासून दररोज सुनावणी घेण्यात येईल असा निकाल दिला आहे. त्यामुळं सरकारच्या हे कलम रद्द करण्याच्या निर्णयाचं काय होणार याकडं सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

 

सुप्रीम कोर्टानं म्हटलं, २ ऑगस्टपासून सोमवार आणि शुक्रवार वगळता या एकत्रित याचिकांवर दररोज सुनावणी घेण्यात येईल. या सुनावणीदरम्यान, दस्ताऐवजांचं सुटसुटीत संकलन करण्यासाठी कोर्टानं नोडल अधिकारी म्हणून दोन वकिलांची नेमणूक केली आहे. तसेच या याचिकांचं लेखी सबमिशन २७ जुलै रोजी किंवा त्यापूर्वी दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यानंतर यांमध्ये कोणत्याही अतिरिक्त याचिकांचा समावेश केला जाणार नाही, असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. 

 

 

दरम्यान, आयएएस अधिकारी शाह फैसल आणि कार्यकर्त्या शेहला रशीद यांना कलम ३७० रद्द करण्याविरोधात दाखल केलेल्या आपल्या याचिकांचा पाठपुरावा करायचा नाही. तसेच न्यायालयीन रेकॉर्डमधून त्यांची नावे हटवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. कोर्टानं त्यांची नावं याचिकाकर्ते म्हणून हटवण्याच्या विनंतीला परवानगी दिली आहे.