मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

एनआयए महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणार छापेमारी सुरु केली आहे. दहशतवादी कारवायांच्या संशयावरून एनआयएकडून मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापेमारी केली आहे. NIA ने ISIS च्या संपर्कात असलेल्या नागपाडा येथील रहिवाशाविरुद्ध २८ जून रोजी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या संपर्कात आणखी काही लोक असल्याच्या संशयावरून संबंधित ठिकाणी छापे टाकले आहेत.

 

मुंबई आणि पुण्यात एनआयए आणि मुंबई पोलिसांनी चार ठिकाणी छापेमारी केली आहे. एनआयएने मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. ISIS च्या संपर्कात असलेल्याच्या संशयावरून चौघांना अटक करण्यात आली आहे. नागपाडा येथील एका रहिवाशा विरुद्ध एनआयएने २८ जून रोजी गुन्हा दाखल केला होता.

 

आणखी काही जण संपर्कात असल्याचा एनआयएला संशय होता. त्यानुसार छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईतील दोन, तर भिवंडीतील पडघा येथे दोन आणि पुण्यात एकाला अटक करण्यात आले आहे.

 

एनआयएने मुंबई आणि भिवंडी प्रत्येकी दोन-दोन ठिकाणी आणि पुण्यात एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहेत.मुंबईसह पुण्यात एनआयए कडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. नागपाडा येथील नागपाडा पोलीस ठाण्याजवळ छापा टाकण्यात आला आहे.