बेपत्ता पाणबुडी अखेर सापडली!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
ओशियन गेट पाणबुडी
ओशियन गेट पाणबुडी

 

रविवारी टायटॅनिकच्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा “भयंकर स्फोट ” झाला, ज्यात जहाजावरील सर्वांचा मृत्यू झाला असे यूएस कोस्ट गार्ड रिअर ऍडमी. जॉन मॅगर यांनी गुरुवारी सांगितले.

 

ओशियन गेट या पर्यटन कंपनीच्या एका छोट्या पाणबुडीमधून पाच अब्जाधीश टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेले होते. रविवारी टायटन या सबमरीन मधून हे अटलांटिक महासागराच्या तळाशी जात होते. मात्र, काही तांत्रिक बिघाडामुळे या पाणबुडीचा आणि त्यासह त्यातील सर्वांचा संपर्क तुटला. यानंतर बेपत्ता झालेल्या या सर्वांचा शोध सुरू करण्यात आला होता. दुर्दैवाने आज ओशियन गेटने या पाणबुडी मधले सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत असे आपल्या अधिकृत स्टेटमेंट मध्ये जाहीर केले आहे.

 

बेपत्ता पाणबुडीत कोण होते?

बेपत्ता झालेल्या पाणबुडीत ब्रिटनचे अब्जाधीश उद्योगपती हामिश हार्डिंग (वय ५८) यांच्यासह पाकिस्तानचे अब्जाधीश उद्योगपती शहजादा दाऊद (वय ४८) आणि त्यांचा मुलगा सुलेमान (वय १९) हे देखील होते. या तीन पर्यटकांशिवाय एक पायलट आणि एक कंटेंट एक्सपर्ट असे एकूण पाच लोक असलेल्या पाणबुडीनं न्यूफाऊंडलँडच्या सेंट जॉन्स इथून पाण्यात डुबकी लावली.

 

त्यानंतर टायटॅनिकच्या अवशेषांपर्यंत पोहोचून पुन्हा परत समुद्राबाहेर येण्साठी आठ तासांचा कालावधी लागतो. पण टायटन त्यात यशस्वी ठरली नाही. ओशनगेट एक्स्पिडिशन्सने नुकतेच जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की. “आमचे सीईओ स्टॉकटन रश, शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, हमिश हार्डिंग आणि पॉल-हेन्री नार्गोलेट यांना दुर्दैवाने आपण गमावले आहे यावर आपल्याला विश्‍वास ठेवावा लागणार आहे ”

 

ओशनगेटने या निवेदनात म्हटले आहे की, या दु:खद काळात या पाच आत्म्यांसोबत आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत आम्ही पूर्ण अंतःकरणाने आहोत. ज्यांनी त्यांच्या आप्त स्वकीयांचा जीव गमावला त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.”