सौदीसाठी ऐतिहासिक दिवस! बुरख्यातील पहिल्या महिलेने अंतराळात घेतली भरारी

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 11 Months ago
सौदी अरेबियातील पहिली महिला अंतराळवीर 'रायना बरनावी'
सौदी अरेबियातील पहिली महिला अंतराळवीर 'रायना बरनावी'

 

सौदी अरब येथील रायना बरनावी देशातली पहिली महिला अंतराळवीर ठरली आहे. २१ मे हा सौदीसाठी ऐतिहासिक दिवस ठरला आहे. रायना बरनावी  आपल्या तीन सहकाऱ्यांसह निजी एक्स-२ मिशनमध्ये सहभागी झाली. 

सौदीतील अनेक महिला आणि तरुणींसाठी रायना आदर्श ठरली आहे. ज्या सौदी अरबमध्ये महिलांसाठी कठोर कायदे आहेत, त्याच देशातील एक महिला आता अंतराळाचा प्रवास करत आहे. 

रायना बरनावी हिने न्यूझिलंडच्या ओटागो विद्यापीठातून बायोमेडिकलमध्ये पदवी घेतली आहे. तिने सौदी अरबमधून बायोमेडिकल सायन्समध्ये मास्टर्स केलं आहे. स्तन कॅन्सर आणि स्टेम सेल कॅन्सर विषयात तिने नऊ वर्षे काम केलं आहे. ती आता आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या १० दिवसांच्या मिशनवर गेली आहे. ती पहिली मुस्लिम अंतराळवीर ठरली आहे.

रायना बरनावी ही सौदी अरबची पहिली महिला अंतराळ प्रवाशी ठरली असून तीने  आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनसाठी उड्डाण केली आहे. बरनावी हिच्यासह या मिशनमध्ये नासाचे माजी अंतराळवीर पैगी व्हिटसन सहभागी झाले आहेत. तेच या मिशनचं नेतृत्व करीत आहेत. तसेच अली अकरानी हेही या मिशनमध्ये सहभागी आहेत.

बरनावी ही एक्सिओम मिशन २ (एक्स-२) मध्ये स्पेशालिस्ट म्हणून काम करेल. आपल्या पारंपारिक प्रतिमेला छेद देण्यासाठी सौदीने हे मोठं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. काल २१ मे रोजी फ्लोरिडाच्या कॅनावेरल येथील केनडी स्पेस सेंटर येथून सौदीतील वेळेनुसार सायंकाळी ५.३७ वाजता स्पेसएक्स फाल्कन ९ रॉकेटद्वारे उड्डाण केली.

रायनाची अधिक माहिती सांगणारा हा लेखही वाचा 👇🏻