कुलपती नजमा अख्तर यांना सेवानिवृत्तीवेळी 'जामिया'ने दिला भावपूर्ण निरोप

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 8 Months ago
जामिया मिलीया इस्लामियाच्या पहिल्या महिला कुलपती नजमा अख्तर
जामिया मिलीया इस्लामियाच्या पहिल्या महिला कुलपती नजमा अख्तर

 

नजमा अख्तर या एक भारतीय शैक्षणिक आणि लेखिका आहेत. जामिया मिलीया इस्लामियाच्या कुलपती नजमा अख्तर यांचा कार्यकाळ नुकताच संपला. १२ एप्रिल २०१९ पासून त्या विद्यापीठाच्या कुलपती म्हणून कार्यरत होत्या.  त्या जामियाच्या पहिल्या महिला कुलपती ठरल्या. विद्यापीठाकडून त्यांना सहृदपणे नुकताच निरोप देण्यात आला. 

नजमा अख्तर जन्म १९५८मध्ये झारखंड राज्यातील रांची शहरात झाला. त्यांचे वडील मुहम्मद अख्तर प्रसिद्ध वकील आणि समाजसेवक होते. नजमा अख्तर यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून बी.ए. आणि एम.ए. पदवी प्राप्त केली. त्यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. नजमा अख्तर यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून केली. त्यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातही अध्यापन केले. १९९५ मध्ये त्या जामिया मिलीया इस्लामियात प्राध्यापिका म्हणून नियुक्त झाल्या. त्या १९९९ ते २००५ या काळात जामिया मिलीया इस्लामियाच्या समाजशास्त्र विभागाच्या प्रमुखही होत्या.

कुलपती म्हणून नजमा अख्तर यांनी जामियाच्या शैक्षणिक आणि संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली. त्यांनी जामियामध्ये नवीन अभ्यासक्रम आणि कार्यक्रम सुरू केले. विद्यापीठामध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी  नवनवीन उपक्रम सुरू केले. शिक्षणक्षेत्रातील योगदानासाठी २०२२ मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे.