UGC ने बदलले सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीचे नियम!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
UGC सचिव प्राध्यापक मनीष जोशी
UGC सचिव प्राध्यापक मनीष जोशी

 

सहाय्यक प्राध्यपक पदासाठी अर्ज करणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी नवीन नियम जारी केले आहेत.

 

आता NET/SET/SLET हे सर्व उच्च शिक्षण संस्थांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी किमान निकष असतील अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)ने दिली आहे.

 

आता उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या म्हणजेच असिस्टेंट प्रोफेसर थेट भरतीमध्ये किमान पात्रता निकष लावत NET/SET/SLET हे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

 

UGC सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी ३० जून २०२३  रोजी याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे आणि नवीन नियम १  जुलै २०२३  पासून लागू करण्यात आले आहेत.