आता शाळा-महाविद्यालयांत दररोज वाचावी लागणार संविधानाची प्रस्तावना

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

बंगळूर : सरकारी, अनुदानित आणि खासगी यासह सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी दररोज संविधानाची प्रस्तावना वाचली पाहिजे. सर्व सरकारी कार्यालये आणि विभागांना गुरुवारी संविधानाच्या प्रस्तावनेचा फोटो लावण्याचा आदेश सरकारने दिला आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली काल विधानसौध येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे चित्र लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्वातंत्र्य संग्रामामागील विचार, संविधानाची माहिती नागरिकांना समजली पाहिजे.

विशेषत: शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील तरुणांनी त्याचे वाचन केले पाहिजे. सरकारी असो, अनुदानित किंवा खासगी शाळा असो तेथील विद्यार्थ्यांनी संविधानाची प्रस्तावना अनिवार्यपणे वाचली पाहिजे, असे समाजकल्याण मंत्री एच. सी. महादेवाप्पा यांनी कॅबिनेट बैठकीनंतर म्हणाले. महादेवप्पा म्हणाले, ‘‘संविधानाची मूलभूत उद्दिष्टे आणि सर्व जाती आणि धर्मांना समान वागणूक मिळण्यास सक्षम करणे, हा यामागचा उद्देश आहे.’’