अंजुमन इस्लामतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
अंजुमन इस्लामतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा
अंजुमन इस्लामतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

 

मुंबई : अंजुमन इस्लाम या स्वातंत्र्य लढ्याचा वारसा असलेल्या शिक्षण संस्थेच्या बोरीबंदर, मुंबई येथील ऐतिहासिक वास्तुमध्ये प्रजासत्ताक दिनसाजरा करण्यात आला.  यानिमित्ताने परेड व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.

 

शिक्षक व मुलांची कल्पकताया वेळी दिसून आली. ९७ शाळा व महाविद्यालये तसेच, दोन अनाथालय चालविणाऱ्या या संस्थेच्या स्थापनेला दीडशे वर्षपूर्ण होत आहेत. “येत्या २३ फेब्रुवारीपासून दीडशे वर्षपूर्ण झाल्याबद्दलआयोजित केलेल्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले जाणार आहे,” असे अंजुमनचे अध्यक्ष डॉ.झहीर काझी यांनी सांगितले.


“वर्षभर यानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार असून सांगता समारंभात, म्हणजे फेब्रुवारी २०२४ मध्ये, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलविण्यात येणार आहे,”असेही डॉ.काझी यांनी सांगितले. दरम्यान,संस्थेच्या विविध शाळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे शिक्षक व विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमात विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष शिक्षणतज्ञ अनिल सहस्त्रबुद्धे,आमदार कपिल पाटील, चित्रपट निर्माते नितीन वैद्य,क्रिकेटपटू गुलाम परकार, उद्योजिका नफिसा खोराईकीवालाआदि मान्यवरउपस्थित होते.