MHT CET २०२३ चा निकाल आज जाहीर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीईटीचा निकाल आज १२ जून रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल फिजिक्स, केमिस्ट्री, गणित आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ग्रुप्ससाठीचा निकाल जाहीर करेल.
परीक्षेचा निकाल MHT CET २०२३ च्या वेबसाइटवर cetcell.mahacet.org वर पाहता येणार आहे. पीसीएम ग्रुपसाठी एमएचटी सीईटी २०२३ परीक्षा ९ ते १४ मे आणि पीसीबी ग्रुपसाठी १५ ते २० मे दरम्यान घेण्यात आली होती. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाली होती. या वर्षी एकूण ४.६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
MHT CET २०२३ चा निकाल कसा -
cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
वेबसाइटच्या होम पेजवर portal links वर क्लिक करा.
यानंतर Check MHT CET Result २०२३ च्या लिंकवर जा.
आता रजिस्ट्रेशन नंबर टाकून लॉगिन करा.
निकाल पाहिल्यानंतर त्याची प्रिंट काढा.