छोट्या पडद्यावर आपल्या दमदार अभिनयशैलीने प्रेक्षकांचे मन जिंकणारा अभिनेता अबरार काझी आता एका अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतो आहे. या वेळी केवळ अभिनय नव्हे, तर गायनाच्या माध्यमातूनही, स्टार प्लस वाहिनीवरील नव्या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अबरारने या मालिकेसाठी 'देवी गमलाधारी' हा खास प्रमोशनल रॅप ट्रॅक गायला आहे.
या गाण्याविषयीचा अनुभव शेअर करताना अबरार म्हणाला, "मी असे काहीतरी पहिल्यांदाच करत आहे! रॅप करेन, अशी कल्पनाही केली नव्हती, पण जेव्हा आमच्या क्रिएटिव्ह डायरेक्टरने मजेसाठी विचारलं, मी सहज म्हणालो की मी रॅप करू शकतो -आणि तिथून सुरुवात झाली. एक छोटी क्लिप फोनवर रेकॉर्ड केली आणि शेवटी मी स्टुडिओमध्ये गाणं रेकॉर्ड करत होतो."
गायनाबरोबरच तांत्रिक बाबतीतही रस असलेला अबरार सांगतो, "मला अभिनयाशिवाय दिग्दर्शन, संकलन आणि 'व्हीएफएक्स' मध्येही रस आहे, पण रॅप हा माझ्या मनात घर करून राहिलेला एक खास कोपरा आहे, जो आता शेवटी लोकांसमोर आला."