अभिनेता जायद खानने अशी साजरी केली बकरी ईद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 5 d ago
जायद खानने कुटुंबियांसोबत साजरी केली ईद.
जायद खानने कुटुंबियांसोबत साजरी केली ईद.

 

बकरी ईदचा सण अवघ्या देशभरात उत्साहात साजरा होत असताना, अभिनेता जायद खान याने मुंबईतील आपल्या निवासस्थानी कुटुंब आणि जवळच्या मित्रांसह हा सण अत्यंत खास पद्धतीने साजरा केला. या सौहार्दपूर्ण सोहळ्यात जायद यांची पत्नी मलाइका, मुले जिदान आणि एरिज, वडील संजय खान, आई जरीन खान, तसेच प्रसिद्ध गझल गायक तलत अजीज आणि त्यांच्या पत्नी बीना अजीज यांची उपस्थिती होती. खान कुटुंबियांचा हा एकत्रित उत्सव त्यांच्यातील प्रेम, एकता आणि सांस्कृतिक मूल्यांचं प्रतीक ठरला.

जायदने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी संदेश शेअर केला. त्याने लिहिलं, “ईद मुबारक! तुमच्या घरात प्रेम, आनंद आणि प्रकाश कायम राहो. शक्य तितकं दान करा, कारण खरं समाधान यातच आहे.” या शब्दांमधून जायदने बकरी ईदमागील खऱ्या तत्त्वाला, म्हणजेच प्रेम, दान आणि सौहार्दाला, उजागर केलं. त्याच्या या संदेशाने चाहत्यांमध्ये सणाच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे.

खान कुटुंबाने अनेक पिढ्यांसह एकत्र येऊन हा सण साजरा केला, जे सामाजिक एकतेचं आणि कौटुंबिक बंधांचं उत्तम उदाहरण आहे. जायद यांनी या उत्सवात कुटुंबासोबत वेळ घालवताना पारंपरिक पद्धतीने कुर्बानी केली. 

वर्क फ्रंटवर जायद खान लवकरच त्याच्या डिजिटल पदार्पणातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो ‘द फिल्म दॅट नेव्हर वॉज’ या चित्रपटात दिसणार असून, त्याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्साह आहे. जायदने यापूर्वी ‘मैं हूं ना’, ‘शब्द’ यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्याचं हे नवं पाऊल त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा देणार आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter