धर्मेंद्र अखेर रुग्णालयातून घरी परतले! कुटुंबाने घेतला मोठा निर्णय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र

 

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज (सुट्टी) देण्यात आला आहे. बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी घरी नेण्याचा निर्णय घेतला आहे.

"धर्मेंद्रजींना सकाळी ७.३० च्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कुटुंबीयांनी घरीच उपचार देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यावर आता घरीच उपचार केले जातील," अशी माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी पीटीआयला दिली. हे बॉलिवूड अभिनेते गेल्या काही आठवड्यांपासून रुग्णालयात वारंवार दाखल होत होते.

दरम्यान, धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल ईशा देओल आणि हेमा मालिनी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ईशाने म्हटले, "माझे वडील स्थिर आहेत आणि बरे होत आहेत. आम्ही सर्वांना विनंती करतो की आमच्या कुटुंबाला प्रायव्हसी (गोपनीयता) द्या. पापांच्या जलद बरे होण्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद."

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत पसरलेल्या 'खोट्या बातम्यां'वर हेमा मालिनी यांनीही जोरदार टीका केली आहे.

सनी देओल यांच्या टीमनेही एका निवेदनात म्हटले आहे की, ते उपचारांना प्रतिसाद देत बरे होत आहेत. "सर बरे होत आहेत आणि उपचारांना प्रतिसाद देत आहेत, आपण सर्वजण त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करूया ", असे निवेदनात म्हटले आहे.

या बातमीने त्यांच्या चाहत्यांना आणि कुटुंबियांना मोठा दिलासा दिला आहे. हेमा मालिनी आणि ईशा देओल रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर काही वेळाने सनी आणि बॉबी देओल रुग्णालयात पोहोचले.

अभिनेते बरे होत असल्याचे जाणून नेटकऱ्यांना आणि चाहत्यांना आनंद झाला. त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या खोट्या बातमीवर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी या खोट्या दाव्यांबद्दल आपला राग व्यक्त केला, पण त्याचबरोबर त्यांचे लाडके बॉलिवूड स्टार बरे होत आहेत हे जाणून त्यांना दिलासाही मिळाला.

हेमा मालिनी यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर जारी केलेल्या निवेदनावर प्रतिक्रिया देताना, एका इंटरनेट युजरने लिहिले - “मॅम, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. मी आमच्या लाडक्या पाजींच्या जलद बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.”

“लव्ह यू धरमजी, तुम्ही लवकरात लवकर आपल्या घरी या, आणि चित्रपट करा,” अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका चाहत्याने दिली.