सैफ अली खानच्या पॅलेसवर फडकतोय हा झेंडा ?

Story by  Chhaya Kavire | Published by  [email protected] • 6 Months ago
सैफ अली खान पतौडी पॅलेस
सैफ अली खान पतौडी पॅलेस

 

सैफ अली खान आणि करीना कपूर खान नुकतेच त्यांच्या मुलांसह ख्रिसमसच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. यासाठी ते आपल्या वडिलोपार्जित पतौडी पॅलेसमध्ये गेले होते. पतौडी पॅलेस एका राजवाड्यापेक्षा कमी नाही. करिनाने तिच्या इन्स्टावर व्हेकेशनची झलक शेयर केली आहे. यात ती सैफसोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे.

तैमूर आणि जेहसह करीना आणि सैफ सोमवारी सकाळी पतौडी पॅलेसमध्ये पोहोचले. तेथून करीनाने काही फोटो शेअर केले आहेत. तर या फोटोंमध्ये एका गोष्टीने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

करीना कपूरने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात सैफ अली खान सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना दिसत आहे. कधी तो पतौडी पॅलेसच्या बागेत फिरताना दिसतो तर कधी जेवणाच्या टेबलावर बसून पोज देताना दिसतो.

पोस्ट शेअर करताना करिनाने एक कॅप्शनही दिले आहे. करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे - 'मक्की की रोटी, सरसों दा साग... आमच्या घरच्या बागेतून. या माझ्या काही आवडत्या गोष्टी आहेत.'

तर यातील सैफ अली खानचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ज्यात तो पतौडी पॅलेसकडे पाहत आहे. यावेळी सर्वांचे लक्ष पतौडी पॅलेसवरील ध्वजाकडे लागले. यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करून पतौडी पॅलेसवर कोणाचा झेंडा फडकत आहे? हे विचारण्यास सुरुवात केली आहे.

पतौडी पेसेलवर लावलेला हा ध्वज पतौडी संस्थानचा आहे. जे भारतातील एक छोटेसे संस्थान होते. 1804 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत त्याची स्थापना करण्यात आली होती. या संस्थानाचे पहिले नवाब सैफ अली खान याचे पूर्वज फैज तलब खान होते. जे अफगाणिस्तानातून भारतात आले होते. पण आजही या आलिशान महालावर पतौडी संस्थानचा झेंडा फडकत आहे.

करीना आणि सैफच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर करीना 'द बकिंघम मर्डर्स', 'द क्रू' आणि 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे, तर सैफ 'देवरा'मध्ये दिसणार आहे.